---Advertisement---

“हार्दिकला भारताचा कर्णधार न केल्याचे वाईट वाटले, तो चांगला पर्याय ठरला असता”

On: बुधवार, जुलै 14, 2021 10:45 PM
Hardik Pandya, Rishabh Pant
---Advertisement---

भारताचा मर्यादित षटकांचा संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर गेलेला असून 18 जुलैपासून एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टी20 मालिका होईल. या दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मासह अनेक वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे, तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे असेल. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड होण्यापूर्वी कर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याचेही नाव चर्चेत होते. मात्र, त्याला ही संधी दिलेली नाही. याबद्दल आता पंड्याचे लहानपणाची प्रशिक्षक जितेंद्र सिंग यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिककडे सर्व गुण आहेत
कसोटी फलंदाज म्हणून हार्दिकने 11 कसोटीतील 18 डावांमध्ये 31.29 च्या सरासरीने 532 धावा केल्या आहेत. यात एका शतकासह 4 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध केपटाउन येथे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळींपैकी एक खेळी साकारली होती. त्याने 7 क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर येत 95 चेंडूमध्ये 93 धावा केल्या होत्या. यानंतर हार्दिकल खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणारा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखू जाऊ लागले.

हार्दिकचे बालपण प्रशिक्षक जितेंद्रसिंग यांना त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल शंका नाही. त्याचबरोबर ते म्हणाले की, कसोटी फलंदाज म्हणून पूर्णपणे यशस्वी होण्यासाठी त्याच्याकडे तंत्र, कौशल्य आणि निपुणता देखील आहे.

प्रशिक्षक जितेंद्र यांनी क्रिकेटनेक्स्ट सोबत बोलताना सांगितले की, ‘हार्दिक संघासाठी उत्कृष्ट कामगिरी करू शकतो. त्याच्याकडे तंत्र, नैसर्गिकता आणि परिपक्वता आहे आणि त्याला संधी दिल्यास तो स्वत:ला सिद्ध ही करु शकतो. परिस्थिती कशी का असेना त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याचे तंत्र चांगले आणि सोपे आहे.’

हार्दिकला नेतृत्व न दिल्याने प्रशिक्षक नाराज
श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपदासाठी हार्दिकच्या नावचा कर्णधार म्हणून संघ व्यवस्थापकांनी विचार केला नाही म्हणून प्रशिक्षक जितेंद्र निराश झाले आहे.

जितेंद्र म्हणाले की, “खरंच मला खूप वाईट वाटले आहे. तो चांगला पर्याय ठरला असता कारण त्याने भारतीय संघासाठी पाच ते सात वर्षे खेळू शकतो. त्याच्याकडे कर्णधारपदासाठी नवीन कल्पना आणि भरपूर ऊर्जा आहे. तो संघासाठी एक चांगली गुंतवणूक ठरू शकला असता विशेषतः मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी.’

अष्टपैलू म्हणून कामगिरीची आता आवश्यकता
जितेंद्रचा असा विश्वास आहे की, स्टारडममुळे हार्दिकमध्ये काही बदलले नाही. ते पुढे म्हणाले की, “खरं सांगायचं झालं तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक आणि खेळाडूंकडून जे काही शिकायला मिळालं, त्यातून त्यानेच मला नंतर खूप काही शिकवलं आहे. जर तुम्ही चांगली व्यक्ती असाल तर तुम्ही एक चांगला क्रिकेटपटू व्हाल. क्रिकेट म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा एक उप-उत्पादन आहे.

अष्टपैलू म्हणून हार्दिकने चांगली कामगिरी करावी अशी आता जितेंद्र यांची देखील इच्छा आहे. २०१९ विश्वचषकानंतर हार्दिकच्या पाठीची शस्त्रक्रिया करावी लागली होती. त्यानंतर त्याने फार कमी वेळा गोलंदाजी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

टोकियो ऑलिंपिकसाठी भारताच्या खेळाडूंचे जाणार इतिहासातील सर्वात मोठे पथक, ‘इतक्या’ महिला आणि पुरुष खेळाडूंचा समावेश

‘यशस्वी झाल्यावर मी तुझ्यासोबत आयस्क्रीम खाईल’, स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला मोदींची ऑफर; घ्या जाणून

टोकियो ऑलिंपिकसाठी पीव्ही सिंधू सज्ज, स्पर्धेपूर्वी करुन घेतले खास नेल आर्ट, फोटो व्हायरल

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---