बीसीसीआयने 21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या महिला टी20 विश्वचषकासाठी भारतीय महिला संघाची आज(12 जानेवारी) घोषणा केली आहे. या संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौर संभाळेल, तर उपकर्णधारपदी सांगलीच्या स्म्रीती मंधनाची निवड झाली आहे.
15 जणींच्या या भारतीय संघात बंगालची फलंदाज रिचा घोषचा समावेश करण्यात आला आहे. तिने अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही. हा एकमेव मोठा बदल भारतीय संघात करण्यात आला आहे.
त्याचबरोबर या संघात 15 वर्षीय शेफाली वर्माचाही समावेश असून टी20 विश्वचषक तिची पहिलीच आयसीसीची मोठी स्पर्धा असणार आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये फेब्रुवारी-मार्च दरम्यान होणाऱ्या या महिला टी20 विश्वचषकात भारताचा साखळी फेरीसाठी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका आणि बांगलादेशसह अ गटात समावेश आहे.
या महिला विश्वचषकाला 21 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघातील सामन्याने सुरुवात होणार आहे. त्यानंतर भारतीय महिला संघ साखळी फेरीत बांगलादेश, न्यूझीलंड आणि श्रीलंका विरुद्ध अनुक्रमे 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला सामने खेळेल.
या विश्वचषकाचा अंतिम सामना 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी पार पडणार आहे.
या विश्वचषकाआधी भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड महिला संघांविरुद्ध तिरंगी टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीही 16 जणींच्या भारतीय संघाचीही घोषणा झाली आहे.
टी20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारतीय संघातील सर्व खेळाडूंची या तिरंगी टी20 मालिकेसाठीही निवड झाली आहे. फक्त या मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात नुझत परवीनचा 16 वी खेळाडू म्हणून समावेश आहे. ही तिरंगी टी20 मालिका 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
टी20 महिला विश्वचषकासाठी असा आहे भारतीय संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधना, शेफाली वर्मा, जेमीमाह रोड्रिगेज, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी.
तिरंगी टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय महिला संघ –
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्म्रीती मंधना, शेफली वर्मा, जेमीमाह रॉड्रिगेज, हर्लीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, नुझत परवीन.
संपुर्ण यादी- बीसीसीआयचे २०१८-१९ मोसमाचे पुरस्कार घोषित, बुमराहसह या खेळाडूंचा होणार गौरव
वाचा????https://t.co/ss93uq6OR3????#म #मराठी #Cricket @BCCI @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 12, 2020
टी२० क्रमवारीत नवदीप सैनीने घेतली मोठी गरुडझेप!
वाचा- ????https://t.co/WZKwX4Gos5????#म #मराठी #Cricket #NavdeepSaini
— Maha Sports (@Maha_Sports) January 11, 2020