---Advertisement---

टी-20 वर्ल्डकपपूर्वी भारताला मोठा धक्का; अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर, बदली खेळाडूचे नाव समोर

On: शुक्रवार, फेब्रुवारी 6, 2026 4:17 PM
---Advertisement---

भारतीय संघाला टी-20 विश्वचषकाच्या तोंडावर मोठा धक्का बसला आहे. संघाचा वेगवान गोलंदाज हर्षित राणा गुडघ्याच्या दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने पत्रकार परिषदेत हर्षित सध्या पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती दिली.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या सराव सामन्यादरम्यान हर्षितच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. गोलंदाजी करताना दोनदा रन-अप घेतल्यानंतरही तो चेंडू टाकू शकला नाही आणि गुडघा धरत मैदानाबाहेर गेला. वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या गुडघ्यात लेटरल मेनिस्कस टिअर असल्याचे निष्पन्न झाले असून, डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिला आहे. त्यामुळे हर्षितसाठी या विश्वचषकात खेळणे अशक्य ठरले आहे.

हर्षित राणा गेल्या काही काळापासून भारतीय टी-20 संघाचा नियमित सदस्य होता आणि त्याची अनुपस्थिती भारतासाठी मोठा फटका मानली जात आहे. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, त्याची रिप्लेसमेंट म्हणून मोहम्मद सिराजची संघात निवड झाली आहे. पण याबाबत अद्याप बीसीसीआयकडून कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

आयसीसी पुरुष टी-20 वर्ल्डकप 2026 : भारताचा ग्रुप स्टेज वेळापत्रक

तारीखसामनास्थळवेळ (IST)
7 फेब्रुवारी 2026भारत vs अमेरिकावानखेडे स्टेडियम, मुंबईसायं. 7:00
12 फेब्रुवारी 2026भारत vs नामिबियाअरुण जेटली स्टेडियम, दिल्लीसायं. 7:00
15 फेब्रुवारी 2026भारत vs पाकिस्तानसिंहलीज स्पोर्ट्स क्लब, कोलंबोसायं. 7:00
18 फेब्रुवारी 2026भारत vs नेदरलँड्सनरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादसायं. 7:00

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---