बीसीसीआयने भारताच्या श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडियाला श्रीलंकेत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तितक्याच टी-20 मालिका खेळायच्या आहेत. या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी रियान परागची वनडे आणि टी-20 या दोन्ही संघांमध्ये निवड केली आहे. मात्र, या निर्णयामुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
रियान परागची निवड पाहून चाहते अचंबित झाले आहेत. वास्तविक, परागला एकदिवसीय मालिकेत रिंकू सिंगपेक्षा आणि टी-20 मालिकेत रुतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्मासारख्या तेजस्वी खेळाडूंपेक्षा प्राधान्य देण्यात आले. अशा परिस्थितीत चाहत्यांना हा निर्णय आवडलेला नासल्याचे दिसत आहे.
Genuinely Feeling Bad For #RuturajGaikwad and “Abhishek Sharma” 🥹
They Literally Deserves More Then Riyan Parag
Par Maje To Bhaii Gill Ke Hain #INDvsSL pic.twitter.com/IlygUFvWEq— 𝐏𝐚𝐭𝐭𝐡𝐚𝐫𝐛𝐚𝐣 🗿 (@Patharbaj) July 18, 2024
Riyan Parag, The Middle Order Player Who Did Not Perform Much Was Selected In The Team, But Ruturaj Gaikwad, Who Scored Runs At Number 3-4, Was Not Even Selected In The 15 Man Squad.
Unreal Politics And Favouritism Man 🤡. pic.twitter.com/CH62MKUiSC
— Aufridi Chumtya (@ShuhidAufridi) July 18, 2024
भारताने रियान पराग आणि हर्षित राणा यांना वनडे संघात स्थान दिले आहे. रियानने नुकतेच टी-20 पदार्पण केले. निवड समितीने त्याच्यावर विश्वास व्यक्त करत त्याला वनडे संघात समाविष्ट केले. महत्त्वाची बाब म्हणजे रियानही टी-20 संघाचा एक भाग आहे. हर्षित आणि रियान यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
महत्तवाच्या बातम्या-
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!
टीम इंडियात 5 दिग्गज खेळाडू, तरीही ज्युनीयर क्रिकेटरला केले वनडे-टी20 उपकर्णधार
हार्दिक-नताशाच्या मुलाची कस्टडी कुणाकडे रहणार? पहा काय सांगतेय हार्दिकची पोस्ट