युएफा चॅम्पियन्स लीग २०१८-१९च्या गटांचे विभाजन आज रात्री मोनॅको येथे पार पडेल ज्याचे थेट प्रक्षेपण भारतात रात्री ९.३० वाजता होईल. त्याआधी कोणते संघ कसे पात्र झाले आणि कसे होईल गट विभाजन याबद्दल थोडे जाणून घेऊ.
किती आणि कसे पात्र ठरतात संघ :-
एकूण ३२ संघ यावर्षी चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरले आहेत. त्यातील २६ संघ हे युएफा असोसिएशन सहगुणकाद्वारे (कोईफिशियंट) वेगवेगळ्या पाॅटमध्ये विभाजित होतात.
ते २६ संघ कोणत्या देशाचे आहेत ते खालील प्रमाणे ठरतात:-
युएफा चॅम्पियन्स लीगचा विजेता
युएफा युरोपा लीगचा विजेता
स्पेन, जर्मनी, इंग्लंड, इटली या देशाच्या लीगचे पहिले ४ संघ
फ्रान्स आणि रशियाच्या लीगचे पहिले २ संघ
पोर्तुगाल, युक्रेन, बेल्जियम आणि टर्कीच्या लीगचे विजेते
जर युएफा चॅम्पियन्स लीगचा विजेता संघ त्यांच्या देशाच्या लीग मधून पात्र ठरला तर त्यांच्या जागेवर चेक रिपब्लिकचा विजेता आणि युएफा युरोपा लीगचा विजेता त्यांच्या देशाच्या लीग मधून पात्र ठरला तर त्यांच्या जागेवर फ्रान्स लीगचा तिसरा स्थानावरील संघ युएफा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरतो.
कोणत्याही देशाचे ५ पेक्षा जास्त संघ युएफा चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरू शकत नाही.
तर उरलेले ६ संघ पात्रता फेरी खेळून पात्र होतात.
कसे पडतील युएफा चॅम्पियन्स लीगचे गट:-
सर्व ३२ संघ ४ पॉटमध्ये वेगवेगळे केले जातात आणि त्यांचे नंतर ८ गट पडतात. पहिल्या पॉटमध्ये युएफा चॅम्पियन्स लीग आणि युएफा युरो लीगचे विजेते आणि सर्व लीगचे विजेते असतात तर उरलेल्या ३ पॉट मध्ये युएफा असोसिएशन सहगुणकाने (कोईफिशियंट) संघ प्रत्येक पॉटमध्ये जातात. यांचे गट पडताना एकच देशाचे २ संघ एकाच गटात येणार नाहीत याची खात्री केली जाते.
तसेच एकाच असोसिएशनच्या २ संघाची जोडी केली आहे त्यांचे सामने वेगवेगळ्या दिवशी येण्यासाठी.
त्या जोड्या खालील प्रमाणे:-
रियल मॅड्रिड आणि बार्सिलोना
अँटलेटिको डी मॅड्रिड आणि वॅलेंसिया
बायर्न आणि डोर्टमंड
मँचेस्टर सिटी आणि टॉटेनहॅम हॉटस्पर्स
जुवेन्टस आणि मिलानो
पॅरिस सेंट जर्मन आणि ल्योन
लोकोमोटिव्ह आणि सीएसकेए
पोर्तो आणि बेनफिका
मँचेस्टर युनाइटेड आणि लीवरपुल
नापोली आणि रोमा
शाएका आणि होफिनहाएईम
ऍजेक्स आणि पीएसवी
तसेच या जोडीमधील एक संघ गट अ, ब, क किंवा ड मध्ये गेल्यावर उरलेला जोडीतील संघ इ, फ, ग किंवा ह गटात जाईल.
४ पाॅट मधील संघ आणि त्या संघांचे सहगुणन खालील प्रमाणे:-
आज होणार्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या ड्राॅ साठी ४ पाॅट मधील संघ आणि त्यांचे युएफा कोईफिशियंट#म #मराठी @Maha_Sports pic.twitter.com/na7oMWQaEX
— Nachiket (@NachiDharankar) August 30, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–लक्ष्मणच्या ड्रीम ११मध्ये मुरली विजयसह काही धक्कादायक नावे
-कोहली आता तरी तो ‘नकोसा’ विक्रम टाळणार का?
-विराटसाठी चौथा कसोटी सामना खास, होणार एक ‘किंग’ रेकाॅर्ड
पुणे- मुंबईत वनडे सामन्यांची मेजवानी, विंडीजच्या भारत दौऱ्याची घोषणा