आयपीएल 2024 चे खिताब पटकवलेल्या केकेआर संघाचा नेतृत्व करणारा स्टार फलंदाज श्रेयस अय्यर पुन्हा एकदा टीम इंडियात परतला आहे. श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी तो भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अय्यरसह ईशान किशनलाही अनुशासनहीनतेच्या आरोपाखाली बीसीसीआयने संघातून वगळण्यात आले होते. याशिवाय या दोन खेळाडूंचे वार्षिक करारही रद्द करण्यात आले आहेत.
आश्या परिस्थितीत श्रेयस अय्यर संघामध्ये परतला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रेयस अय्यरला बीसीसीआयच्या वार्षिक करारमध्ये लवकरच समावेश करण्यात येणार आहे. मात्र, ईशान किशनबाबत असे म्हणता येणार नाही. कारण त्याला अद्याप संघात पुनरागमनाची संधी मिळालेली नाही.
वृत्त अहवलांनुसार, भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी ईशान किशनला देशांतर्गत क्रिकेटमध्ये पूर्ण हंगाम खेळावा लागेल. त्यानंतरच तो संघात पुनरागमन करू शकेल. याशिवाय तो केवळ आयपीएलमध्येच सहभागी होत राहिला तर त्याचे पुनरागमन करणे अधिक कठीण होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या भारतीय संघाकडे रिषभ पंत, केएल राहुल आणि संजू सॅमसनच्या रूपाने 3 यष्टीरक्षक आहेत. ध्रुव जुरेलही रांगेत आहे. अशा स्थितीत किशनला आता आपली लायकी सिद्ध करण्यासाठी जिद्द सोडून देशांतर्गत क्रिकेटकडे वळावे लागणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.
श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज , वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद आणि हर्षित राणा.
महत्तवाच्या बातम्या-
गाैतम गंभीरची गुगली! या खेळाडूच्या निवडीने केले सर्वांना आश्चर्यचकित
टीम इंडियाची घोषणा: गौतम गंभीरचा मास्टर प्लॅन? धोनीच्या विश्वासू खेळाडूला संघातून वगळलं!
टीम इंडियात 5 दिग्गज खेळाडू, तरीही ज्युनीयर क्रिकेटरला केले वनडे-टी20 उपकर्णधार