ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनने संघाच्या प्रशिक्षकाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. भविष्यात ऑस्ट्रेलिया संघाच्या प्रशिक्षकपदाची संधी मिळाल्यास तो अजिबात करणार नाही, असे त्याने म्हटले आहे. यामागे मॅथ्यू हेडनने मोठे कारण सांगितले आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, जस्टिन लँगरची अवस्था पाहून त्याला आता ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक बनण्याची अजिबात इच्छा नाही.
2018 मध्ये बॉल टॅम्परिंगच्या घटनेनंतर जस्टिन लँगर (Justin Langer) याची ऑस्ट्रेलियन संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्याच्या प्रशिक्षणाखाली ऑस्ट्रेलियाची कामगिरी बरी राहिली. मायदेशात कसोटी मालिकेत भारताकडून संघाला दोनदा पराभवाला सामोरे जावे लागले होते. मात्र, कांगारू संघाने टी-20 विश्वचषक आणि ऍशेस मालिकेत जबरदस्त विजय मिळवला.
मात्र, असे असतानाही लँगरला प्रशिक्षकपदावरून हटवण्यात आले. लँगरने आरोप केला होता की, काही वरिष्ठ खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य आहेत ज्यांना त्याने प्रशिक्षकपदी राहावे असे वाटत नव्हते. याशिवाय लँगरने आपल्या पाठीमागे बदनामी केल्याचा आरोपही केला होता. तो म्हणाला की, “माझ्यासमोर सगळे चांगले वागत होते पण माझ्या पाठीमागे बरेच काही घडत होते जे मी वर्तमानपत्रात वाचत होतो.”
मॅथ्यू हेडन (Matthew Hayden) याच्या म्हणण्यानुसार, लँगरला ज्याप्रकारे वागणूक दिली गेली, ते पाहता त्याला आता ऑस्ट्रेलिया संघाचा प्रशिक्षक बनण्याची इच्छा नाही. पुढे बोलताना तो म्हणाला, “मी ऑस्ट्रेलियन संघाचा प्रशिक्षक होणार नाही. जस्टिन लँगरला ज्या पद्धतीने वागवले गेले, मी कोणत्याही प्रकारे ऑस्ट्रेलियाचा प्रशिक्षक बनण्याचा प्रयत्न करणार नाही. कारण मला वाटत नाही की मला त्याचा आनंद मिळेल.”
ऑस्ट्रेलिया संघाचा विश्वचषक 2023 मधील पुढील सामना शनिवारी (4 नोव्हेंबर) इंग्लंडविरूद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलिया संघाने या विश्वचषकात आतापर्यंत 6 पैकी 4 सामने जिंकले आहेत. तर ते 8 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आहेत. (I don’t like the Australian team Matthew Hayden shocking statement about Australian team)
म्हत्वाच्या बातम्या
ईडन गार्डन्सवर द.आफ्रिकेशी भिडणार 70 हजार विराट! कॅब करणार कोहलीच्या ‘बर्थ डे’चे जंगी सेलिब्रेशन