ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचने खुलासा केला आहे की, 2018 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर आला होता. तेव्हा त्याला वाईट स्वप्न पडत होते. हे भीतीदायक स्वप्न दुसरे कोणाचे नसून भारताचे धडाकेबाज गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचे होते.
याबद्दल बोलताना फिंचने (Finch) सांगितले की, स्वप्नामध्ये भुवनेश्वर (Bhuvneshwar Kumar) आणि बुमराह (Jasprit Bumrah) त्याची मज्जा म्हणून विकेट घेत आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील अमेझॉनवर रिलीझ झालेली डॉक्यूमेंट्री-सीरिज ‘द टेस्ट’मध्ये फिंच म्हणाला आहे की, “भुवनेश्वर मला बाद करत असल्याने मला घाम फुटत होता.”
फिंचसाठी भारतीय गोलंदाज तिन्ही क्रिकेट प्रकारात चिंतेचे कारण बनले होते. तसेच त्याला भुवनेश्वरच्या इनस्विंग चेंडूवर फलंदाजी करतानाही त्याला खूप त्रास सहन झाला होता. भुवनेश्वरने 4 वेळा फिंचला बाद केले होते. म्हणजेच 3 वेळा वनडेमध्ये आणि 1 वेळा आंतरराष्ट्रीय टी20मध्ये बाद केले होते.
फिंचच्या मनात या दोन्ही भारतीय गोलंदाजांची इतकी भीती (Fear about India Bowlers) निर्माण झाली होती की, तो रात्री झोपेतून उठून बसत होता. फिंच म्हणाला की, “असेही होत होते जेव्हा मी रात्री बाद होण्याच्या भीतीने उठत होतो. मला वाटत होते की, मी उद्या पुन्हा बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करत आहे आणि तो मला आरामात बाद करत आहे.”
भारतीय संघाने 2018-19 दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर इतिहास रचला होता. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्राॅफी 2-1ने जिंकून पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खिशात घातली होती. या चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने 31 धावांनी पहिला कसोटी सामना जिंकला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 146 धावांनी दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली होती.
त्यानंतर तिसरा कसोटी सामना भारतीय संघाने 137 धावांनी जिंकत मालिकेत पुन्हा एकदा 2-1ने आघाडी घेतली होती. मालिकेच्या अंतिम सामन्यात भारताने 600 धावांचे मोठे आव्हान देत ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. त्यानंतर सामना अनिर्णत राहिला होता. भारताच्या वेगवान बुमराहने या 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 21 विकेट्स घेतल्या होत्या.
त्याचबरोबर या दौऱ्यात दोन्ही संघातील टी20मालिका 1-1ने बरोबरीत सुटली होती.
ट्रेंडिंग घडामोडी-
– तमाम क्रिकेटप्रेमींच्या आठवणीतील दिवस: ८ वर्षांपुर्वी सचिनने केलं होतं शतकांचं शतकं
– मस्ती-मस्तीत गेलने म्हटला हिंदी डायलॉग; केलं सोशल मीडियावर स्वत:चंच…
– बांगलादेशचा ‘हा’ कर्णधार टीम कल्चरमध्ये करणार बदल…