‘कॅप्टनकूल’ महेंद्रसिंग धोनी जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक मानला जातो. अनेक दिग्गजांनी धोनीला सर्वोत्तम घोषित केलेले आहे. याच यादीत आता ऑस्ट्रेलियाचा टी20 स्टार बेन डंक याचा देखील समावेश झाला आहे. डंकने धोनीला जगातील सर्वात यष्टीरक्षक मानले आहे.
डंक म्हणाला, “मला वाटते की धोनी हा जगातील नंबर एक यष्टिरक्षक आहे. ज्याप्रकारे धोनीने इतक्या वर्ष क्रिकेट खेळले ते खरोखरच अविश्वसनीय आहे. धोनीचे रेकॉर्ड सत्य परिस्थिती समोर मांडतात.”
डंक पुढे म्हणाला, “धोनीच्या नसांमध्ये बर्फ आहे. धोनी अशा प्रकारच्या परिस्थितीतून सामना जिंकवतो जेथे विचार करणे देखील अवघड आहे. जर मी धोनीच्या 5 ते 10 टक्के जरी खेळू शकलो, तरी ते विशेष असेल.”
डंक आगामी काळात होणाऱ्या अबुधाबी टी10 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. डंक या स्पर्धेत कलंदर्स संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. डंकने स्पष्ट केले की तो टॉम बॅंटम आणि क्रिस जॉर्डनसारख्या इंग्लिश सुपरस्टार सोबत खेळण्यास उत्सुक आहे. डंक म्हणाला की, जॉर्डन हा उत्कृष्ट गोलंदाज असून त्याला टी20 क्रिकेटचा मोठ्याप्रमाणात अनुभव आहे.
धोनीचा विचार केला असता तो सध्या क्रिकेट पासून दूर असून त्याने शेतात रमने पसंत केले आहे. धोनी आता मैदानावर थेट आयपीएल 2021 मध्येच दिसणार आहे. आयपीएल 2020 मधील निराशाजनक कामगिरी मागे टाकून धोनी आयपीएल 2021 मध्ये उत्तम कामगिरी करेल अशी सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल २०२१ च्या हंगामात खेळताना दिसू शकतो अर्जून तेंडुलकर; लिलावासाठी ठरला पात्र
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यांत केवळ ‘या’ दोन खेळाडूंनाच करता आली त्रिशतकी खेळी
टीम इंडियाच्या कामगिरीवर इंग्लंडचे माजी कोच फिदा, म्हणाले “भारताला मायदेशात हरवणे कठीण”