CWC23 Final Virat Kohli Half Century: भारतीय संघाचा विस्फोटक फलंदाज विराट कोहली याच्यासाठी विश्वचषक 2023 स्पर्धा खूपच चांगला ठरली आहे. तो या स्पर्धेत जबरदस्त प्रदर्शन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, विराटने विश्वचषक 2023 अंतिम सामन्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये अर्धशतकही झळकावले. स्पर्धेत 50हून अधिक धावा करण्याची ही त्याची 9वी वेळ होती. विराटने या अर्धशतकासह खास विक्रमही नावावर केला आहे. विराटने आपल्या नाव दिग्गजांच्या यादीत सामील केले आहे.
विराटचे विक्रमी अर्धशतक
रोहित शर्मा (Rohit Sharma) तंबूत परतल्यानंतर तिसऱ्या स्थानी मैदानावर उतरलेला विराट कोहली (Virat Kohli) सुरुवातीपासूनच लयीत दिसला. रोहित आणि श्रयेस अय्यर यांची एकापाठोपाठ एक विकेट पडल्यानंतर विराटने केएल राहुल याच्यासोबत मोर्चा सांभाळला. विराटने शानदार फलंदाजी करत विश्वचषक 2023 स्पर्धेतील सहावे अर्धशतक पूर्ण केले. विराटने यावेळी 63 चेंडूंचा सामना करताना 54 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश होता.
भारताचा पहिलाच फलंदाज
विराट कोहली वनडे विश्वचषक 2023 (Virat Kohli ODI World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आणि अंतिम सामन्यात 50हून अधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला. तो अशी कामगिरी करणारा जगातील 7वा आणि भारताचा पहिलाच फलंदाज बनला आहे. विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य सामन्यात शानदार फलंदाजी करताना शतक ठोकले होते. त्याने 113 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली होती.
सलग पाचवे अर्धशतक
विराट कोहली याच्या बॅटमधून विश्वचषक 2023 स्पर्धेत निघालेले हे सलग 5वे अर्धशतक आहे. विराटने एका विश्वचषकात सलग 5 अर्धशतके करणारा दुसरा फलंदाज आहे. विशेष म्हणजे, विराटने हा कारनामा 2019च्या विश्वचषकातही केला होता. तसेच, स्मिथने अशी कामगिरी 2015च्या विश्वचषकात केली होती. (icc odi world cup 2023 final ind vs aus virat kohli becomes 7th batsman to score half century in odi world cup knock out matches)
हेही वाचा-
भारतीयांचा हार्ट ब्रेक! World Cup Final मध्ये अर्धशतकानंतर कोहली तंबूत, आता अपेक्षा राहुलकडून
World Cup Final: आक्रमक सुरुवातीनंतर रोहित अन् श्रेयस लागोपाठ तंबूत, विराट मैदानात उभा