नुकतीच आयसीसीकडून रँकिंग जारी करण्यात आली. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघात 3 टी20 सामने खेळले गेले. या सामन्यातील प्रदर्शनामुळे आयसीसी रँकिंग बदलली आहे. अनेक खेळाडूंना रँकिंगमध्ये स्थान मिळाले आहे. याव्यतिरिक्त भारत विरुद्ध वेस्ट इंडिज संघाच्या अखेरच्या वनडे सामन्यातील प्रदर्शनामुळेही रँकिंगमध्ये बदल झाला आहे. वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघ तिसऱ्या स्थानी, तर टी20त अव्वलस्थानी आहे. मात्र, वेस्ट इंडिजने पहिले दोन्ही सामने जिंकल्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले.
टी20 फलंदाजी रँकिंगमध्ये भारतीयांचा दबदबा
फलंदाजांच्या टी20 रँकिंग (T20 Ranking) यादीत सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) अव्वलस्थानी कायम आहे. त्याचे 907 गुण आहेत. तसेच, वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण करणाऱ्या तिलक वर्मा (Tilak Varma) यानेही शानदार फलंदाजीच्या जोरावर रँकिंगमध्ये थेट 46वे स्थान पटकावले. त्याचे 503 गुण आहेत. तसेच, वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन (Nicholas Pooran) यालाही 6 स्थानांचा फायदा झाला. तो 621 गुणांसह 14व्या स्थानी पोहोचला. तसेच, 17 स्थानांच्या फायद्यासह कर्णधार रोवमन पॉवेल 32व्या स्थानी आहे.
गोलंदाजांची कमाल
गोलंदाजांच्या टी20 रँकिंगमध्ये कुलदीप यादव (Kuldeep Yadav) याला 24 स्थानांचा फायदा झाला. तो 490 गुणांसह 51व्या स्थानी विराजमान झाला. तसेच, यजमान संघाचा गोलंदाज अल्झारी जोसेफ 9 स्थानांच्या फायद्यासह आणि अकील होसेन 14व्या स्थानावर आहे. अष्टपैलूंच्या रँकिंगमध्ये अव्वल 10 खेळाडूंमध्ये एकमेव भारतीय हार्दिक पंड्या (Hardik Pandya) दुसऱ्या स्थानी कायम आहे. त्याचे 266 गुण आहेत.
वनडे रँकिंगमध्ये शुबमन गिलला फायदा
फलंदाजांच्या वनडे रँकिंग (ODI Ranking) यादीत अव्वल 10 खेळाडूंमध्ये भारताकडून शुबमन गिल (Shubman Gill) 2 स्थानांच्या फायद्यासह पाचव्या आणि विराट कोहली (Virat Kohli) नवव्या स्थानी आहे. तसेच, अव्वल 10च्या बाहेर ईशान किशन असून तो 9 स्थानांच्या फायद्यासह 36व्या स्थानी, तर पंड्या 10 स्थानांच्या फायद्यासह 71व्या स्थानी आहे. गोलंदाजीत कुलदीप यादव 4 स्थानांच्या फायद्यासह अव्वल 10मध्ये 10व्या स्थानी पोहोचला. तसेच, शार्दुल ठाकूर 3 स्थानांच्या फायद्यासह 30व्या स्थानी आहे. भारताकडून अव्वल 5 गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज आहे. तो चौथ्या स्थानी आहे.
याव्यतिरिक्त अष्टपैलू रँकिंगमध्ये पंड्याला 5 स्थानांचा फायदा झाला असून तो 11व्या स्थानी आहे. तसेच, अव्वल 10मध्ये एकही भारतीय गोलंदाज नाहीये. (icc ranking indian players big jump kuldeep yadav top 10 odi bowlers take a look here)
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-पाकिस्तानसह विश्वचषक 2023 सामन्यांची तिकीटे कधी आणि कशी बुक करायची? ही बातमी वाचाच
नॅशनल अँटी डोपिंग टेस्टचे आकडे समोर, ‘या’ भारतीय धुरंधराने 2023मध्ये केली सर्वाधिक वेळा Doping चाचणी