यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकातील (ICC T20 World Cup) 33वा सामना भारत विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला जाणार होता. हा सामना सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंड, लॉडरहिल, फ्लोरिडा या मैदानावर रंगणार होता. दोन्ही संघांचा यंदाच्या टी20 विश्वचषकातील साखळीफेरीतील हा अखेरचा सामना होता. परंतु पावसानं या सामन्यात खोळंबा घातला. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला.
भारतीय संघानं पहिल्या तीन सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली होती. भारतानं पहिल्या तीन सामन्यांमध्ये आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका संघाचा धुव्वा उडवला होता. आजचा सामना कॅनडाविरुद्ध खेळला जाणार होता. पंचांनी मैदानाचं निरीक्षण केलं, परंतु आउटफील्ड ओली होती. त्यामुळे अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुपर 8 मधील सामन्यापूर्वी भारताचा हा शेवटचा सामना होता. भारत यंदाच्या टी20 विश्वचषकात सुपर 8 साठी क्वालिफाय झालं आहे. परंतु सुपर 8 सामन्यापूर्वी भारताला कॅनडाविरुद्धच्या सामन्यानं फलंदाजीमध्ये सुधार करण्यासाठी थोडी मदत झाली असती. परंतु आता सुपर 8 मध्ये भारत गुरुवारी (20 जून) रोजी अफगाणिस्तान विरुद्ध भिडणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्वाचा असणार आहे.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, यशस्वी जयस्वाल, कुलदीप यादव, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं केलं, पाकिस्तान कर्णधार बाबर आझवर वादग्रस्त वक्तव्य
इंग्लंडसाठी समीकरण गुंतागुंतीचे, स्कॉटलंड-ऑस्ट्रेलिया सामन्यावर नजर, पाऊस पडला तर पाकिस्तानसारखी परिस्थिती
भारत विरुद्ध कॅनडा सामन्यावर पावसाचं सावट! पाहा हवामान अंदाज