मंगळवारी (दि. 31 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश संघात कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर विश्वचषक 2023 स्पर्धेचा 31वा सामना खेळला जात आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा याने मोठे विधान केले आहे. त्याने पाकिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याच्या गोलंदाजीविषयी मत मांडले आहे. तो म्हणाला आहे की, आफ्रिदी चांगली गोलंदाजी करत आहे, पण त्याला इतरांची साथ मिळत नाहीये. यावेळी त्याने पाकिस्तान संघाच्या गोलंदाजीला कमकुवतही म्हटले आहे.
आकाश चोप्राचे विधान
आकाश चोप्रा (Aakash Chopra) याने पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश (Pakistan vs Bangladesh) सामन्यापूर्वी लक्षवेधी विधान केले. तो म्हणाला, “पाकिस्तान संघाच्या सलामीवीरांनी धावा करण्यास सुरुवात केली आहे आणि बाबर आझमही धावा करत आहे. मोहम्मद रिझवाननेही धावा केल्या होत्या. आता तो थोडी वाट चुकला आहे. नाहीतर सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत असता. इफ्तिखार आणि सौद शकील यांनीही धावा केल्या आहेत.”
शाहीन आफ्रिदीच्या स्पर्धेतील कामगिरीविषयी बोलायचं झालं, तर त्याने स्पर्धेत 6 सामने खेळताना 12 विकेट्स घेतल्या आहेत. आकाश आफ्रिदीविषयी बोलताना तो म्हणाला, “हा संघ चांगला आहे, पण गोलंदाजीबाबत कमकुवत वाटत आहे. शाहीन अजूनही विकेट्स घेत आहे. त्याने 5 विकेट्स घेतल्या होत्या, पण त्याच्याव्यतिरिक्त कोण आहे? हॅरिस रौफ तितकी चांगली गोलंदाजी करू शकत नाहीये. मोहम्मद वसीम याने मागील सामना खेळला होता. त्याने चांगली गोलंदाजी केली होती. फिरकी विभागाचे प्रदर्शन सामान्य राहिले आहे.”
पाकिस्तान-बांगलादेश सामन्याविषयी बोलायचं झालं, तर त्यांच्यात आतापर्यंत 38 वनडे सामने खेळले गेले आहेत. यात पाकिस्तानने 33 आणि बांगलादेशने 5 सामने जिंकले आहेत. अशात विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 31व्या सामन्यात पाकिस्तान संघ मोठ्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल. तसेच, बांगलादेश संघही आपल्या दुसऱ्या विजयाच्या प्रतीक्षेत असेल.
पाकिस्तान संघाने आतापर्यंत विश्वचषक स्पर्धेत 6 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना 2 विजय आणि 4 पराभवांचा सामना करावा लागला आहे. त्यांचे उपांत्य फेरीत पोहोचणे कठीण आहे. तसेच, बांगलादेशने 6 सामन्यात 1 विजय मिळवला आहे. ते उपांत्य फेरीतून बाहेर पडले आहेत. (icc world cup 2023 this former indian cricketer reacts on pakistan s bowling issues)
हेही वाचा-
‘असे’ 5 खेळाडू, ज्यांच्याकडून वर्ल्डकपमध्ये कुणालाच नव्हती अपेक्षा, पण आपल्या प्रदर्शनाने करतायेत धमाल
गौतम गंभीरचे रोहितविषयी मोठे विधान; म्हणाला, ‘तो कर्णधारच नाही…’