इंडियन प्रीमियर लीग २०२२ मध्ये आत्तापर्यंत पहिला टप्पा यशस्वी पार पडला आहे. या टप्प्यात अनेक खेळाडूंनी छाप पाडली आहे. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत याची कामगिरी अद्याप यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार म्हणून समाधानकारक राहिली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल सध्या चर्चा होत आहे. असे असतानाच भारताचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागने पंतला सल्ला दिला आहे.
सेहवागच्या (Virender Sehwag) मते, पंतने आता निर्भयतेने दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे नेतृत्व करावे. तसेच पंतने (Rishabh Pant) त्याचा आदर्श असणाऱ्या एमएस धोनीकडून (MS Dhoni) शिकावे, असेही सेहवाग म्हणाला आहे.
सेहवाग क्रिकबझशी बोलताना म्हणाला, ‘रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. जरी सलामीवीरांनी आक्रमक खेळ केला, तरी त्याने मधल्या फळीत धावा करणे महत्त्वाचे आहे. जर तो एमएस धोनीचा चाहता असेल, तर त्याने त्याच्याकडून शिकले पाहिजे. पंतमध्ये अखेरच्या षटकात २०-२५ धावा करण्याची क्षमता आहे. पण त्यासाठी त्याने शेवटच्या षटकापर्यंत मैदानात असणे गरजेचे आहे.’ सेहवागच्या मताशी माजी क्रिकेटपटू आरपी सिंगनेही सहमती दर्शवली होती.
दिल्लीची समाधानकारक कामगिरी
दिल्ली कॅपिटल्सने २०२२ हंगामात (IPL 2022) रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली आत्तापर्यंत ७ सामने खेळले आहेत, त्यातील ३ सामने त्यांनी जिंकले असून ४ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्स संघ सातव्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यतीत त्यांना टिकून राहण्यासाठी पुढील सामने जिंकणे महत्त्वाचे असणार आहे.
रिषभने गेल्यावर्षी म्हणजेच २०२१ आयपीएल हंगामापासून दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्वाची नियमीत धूरा सांभाळली आहे. त्याच्या नेतृत्वाखाली गेल्यावर्षी दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
पंतची आयपीएल २०२२ मधील कामगिरी
पंतने आत्तापर्यंत आयपीएल २०२२ हंगामात ७ सामन्यांत ३७.६० च्या सरासरीने १८८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने एकही अर्धशतक केले नाही.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
‘ना खुद्द विराट खुश आहे, ना लोक’, खराब फॉर्ममधून जात असलेल्या कोहलीबद्दल युवराजचे वक्तव्य
गुरू तसा शिष्य! हैदराबाद फलंदाजांच्या दांड्या उडवत उमरान मलिकचे ‘स्टेन’ स्टाईल सेलिब्रेशन
“उमरान मलिकमधील प्रतिभा ‘दुर्लभ’; ब्रेट ली, अख्तर आणि शॉन टेटनंतर फारच कमी पाहायला मिळाला असा वेग”