नेथन लायन ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा एक दिग्गज फिरकीपटू आहे. बुधवारी लॉर्ड्स कसोटीसाठी त्याची निवड प्लेइंग इलेव्हनमध्ये होताच मोठा विक्रम रचला गेला. ऍशेस 2023चा हा दुसरा सामना असून ऑस्ट्रेलियासाठी सलग 100व्या कसोटी सामन्यात लायन खेळत आहे.
ऍशेस 2023ची सुरुवात यजमान इंग्लंडसाठी अपेक्षित होऊ शकली नाही. पहिल्या सामन्यात पाहुण्या ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला 2 विकेट्सने मात दिली आणि 0-1 अशी आघाडी घेतली. मालिकेतील दुसरा सामना बुधवारी (28 जून) सुरू झाला. या सामन्यात नेथन लायन () खेळणार हे आधीपासूनच निश्चित मानले जात होते आणि झाले देखील तसेच. लायनला या लॉर्ड्स कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले.
ऑस्ट्रेलिनय संघाने खेळलेल्या मागच्या 100 कसोटी सामन्यांचा विचार केला, तर या सर्व सामन्यांमध्ये लायन ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये होता. संघासाठी सलग 100 कसोटी सामने खेळणारा लायन एकमेव गोलंदाज ठरला आहे. सोबतच तो अशी कामगिरी करणारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सहावा क्रिकेटपटू आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार ऍलिस्टर कूक या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे, ज्याने 159 विकेट्स घेतल्या होत्या.
संघासाठी सर्वाधिक सलग कसोटी सामने खेळणारे क्रिकेटपटू:
159 – ऍलिस्टर कूक
153 – ऍलन बॉर्डर
107 – मार्क वॉ
106 – सुनील गावसकर
101 – ब्रँडन मॅक्युलम
100* – नेथन लायन
दरम्यान, उभय संघांतील पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर लायन ऑस्ट्रेलियासाठी सर्वात महत्वाचा गोलंदाज ठरला होता. पहिल्या आणि दुसऱ्या डावात त्याला प्रत्येकी चार-चार विकेट्स मिळाल्या होत्या. त्याच्या एकूण कसोटी कारकिर्दीवर नजर टाकली, तर या फिरकीपटूने ऑस्ट्रेलियासाठी 121 कसोटी, 29 वनडे आणि 2 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (In the second Ashes Test, Nathan Laincha completed 100 consecutive Test matches for Australia)
महत्वाच्या बातम्या –
लॉर्ड्स कसोटीत टॉसचा निकाल इंग्लंडच्या पारड्यात, कांगारुंचा हुकमी एक्का संघात परतला
मुथय्या मुरलीधरनला फुल गॅरेंटी! म्हणाला, वर्ल्डकपमध्ये रोहितचा ‘तो’ विक्रम मोडणे खूपच कठीण