ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बुधवारी (1 मार्च) इंदौरच्या होळकर स्टेडियमवर हा सामना सुरू झाला असून भारतीय संघात दोन महत्वाचे बदल पाहायाला मिळाला. भारताने पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अशात तिसरा सामना जिंकल्यानंतर भारतीय संघ यावर्षीची ही बॉर्डर गावसकर ट्रॉफीही नावावर करेल.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) मागच्या मोठ्या काळापासून धावा करण्यासाठी झगडत होता. पण यापूर्वी राहुलकडे संघाचे उपकर्णधारपद असल्यामुळे तो अनेकदा प्लेइंग इलेव्हनचा भाग असायचा. मागच्या आठवड्यात बीसीसीआयने मालिकेतील तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी संघ घोषित केला तेव्हा राहुलकडून संघाचे उपकर्णधारपद काढून घेतल्याचे दिसले. बुधवारी नाणेफेक जिंकल्यानंतर रोहितने जेव्हा प्लेइंग इलेव्हनची माहिती दिली, तेव्हा राहुलच्या जागी युवा शुबमन गिल (Shubman Gill) याला संघात घेतल्याचेही सांगितले. त्याव्यतिरिक्त अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) यालाही तिसऱ्या कसोटीसाठी विश्रांती दिली गेली आहे. बऱ्याच दिवसांपासून बेंचवर बसलेला उमेश यादव (Umesh Yadav) याला शमीच्या जागी खेळण्याची संधी दिली गेली.
ऑस्ट्रेलियन संघाता त्यांचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) या दोघांचे आगमन झाले आहे. तर दुसरीकडे सलामीवीर डेविड वॉर्नर आणि कर्णधार पॅट कमिन्स यांची ऑस्ट्रेलियाला कमी जाणवू शकते. गे दोघेही तिसऱ्या कसोटीआधी मायदेशात परतले आहेत.
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलियन संघ –
🚨 Team News 🚨
2️⃣ changes for #TeamIndia as Shubman Gill & Umesh Yadav are named in the team. #INDvAUS | @mastercardindia
Follow the match ▶️ https://t.co/xymbrIdggs
Here's our Playing XI 🔽 pic.twitter.com/8tAOuzn1Xp
— BCCI (@BCCI) March 1, 2023
भारत –
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, उमेश यादव, मोहम्मद सिराज.
Australia XI: Usman Khawaja, Travis Head, Marnus Labuschagne, Steve Smith (c), Peter Handscomb, Cameron Green, Alex Carey (wk), Mitchell Starc, Nathan Lyon, Todd Murphy, Matthew Kuhnemann
— cricket.com.au (@cricketcomau) March 1, 2023
ऑस्ट्रेलिया –
ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), पीटर हँड्सकॉम्ब, ऍलेक्स केरी (डब्ल्यूके), कॅमरून ग्रीन, मिचेल स्टार्क, टॉड मर्फी, नाथन लियॉन, मॅथ्यू कुहनेमन.
(In the third Test, India won the toss and elected to bat first. KL Rahul has been dropped from the team)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंदोर कसोटीसाठी टीम इंडियात होणार बदल? प्रदीर्घ काळानंतर ‘या’ दोघांना मिळणार संधी
“बाबर अजून विराटच्या बरोबरीचा नाही”, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितली कमजोरी