भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अलीकडच्या काळात अपेक्षित प्रदर्शन करताना दिसत नाहीये. मंगळवारी (20 सप्टेंबर) भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी-20 सामना खेळला गेला. भारताने या सामन्यात 4 विकेट्सने पराभव स्वीकारला. संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरले गोलंदाजी विभागाचे सुमार प्रदर्शन. भुवनेश्वर कुमार भारतीय संघासाठी सर्वात महागात पडला. त्याने 19 व्या षटकात खर्च केलल्या धावांमुळे संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले, असेच अनेकांना वाटते. माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी या निराशाजनक प्रदर्शनासाठी भुवनेश्वरला सुनावले आहे.
काही दिवसांपूर्वी खेळल्या गेलेल्या आशिया चषक 2022 मध्येही भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) संघासाठी चांगलाच महागात पडला होता. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना जयप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत त्याच्यावर गोलंदाजी विभागाची मदार होती, पण त्याने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. त्याने या सामन्यातील चार षटकांमध्ये 52 धावा खर्च करून एकही विकेट घेतली नाही. भुवनेश्वरचे हे सुमार प्रदर्शन भारतीय संघासाठी चिंतेची बाब ठरताना दिसत आहे. सुनील गावसकर (Sunil Gavasakar) यांनीही भुवनेश्वरच्या प्रदर्शनाविषयी असेच वक्तव्य केले आहे.
माध्यमांशी बोलताना गावसकर म्हणाले की, “मला नाही वाटत की मैदानात खूप जास्त दव होते. खेळाडू किंवा गोलंदाजांना आपण टॉवेलचा वापर करताना पाहिले नाहीये. आपण गोलंदाजीच चांगली करू शकलो नाहीत. भुवनेश्वर कुमारने टाकलेले 19 वे षटक खूपच चिंतेचा विषय आहे. पाकिस्तान श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्याविरुद्ध त्याने 3 षटकांमध्ये 49 धावा दिल्या आहेत. त्याच्यासारख्या गोलंदाजाकडून तुम्ही अपेक्षा ठेवलेल्या असतात की, तो 35-36 धावाच देईल. ही संघासाठी चिंतेची बाब आहे.”
दरम्यान, आशिया चषकाच्या सुपर फोर फेरीत भुवनेश्वरने पाकिस्तानविरुद्ध 19 व्या षटकात 19 धावा दिल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकन संघाविरुद्ध खेळताना त्याने 19 व्या षटकात 14 धावा दिल्या होत्या. अशातच मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याची 19 वे षटक खूपच महागात पडले होते. त्याने या षटकात 16 धावा दिल्या. एकंदरीत पाहता त्याने 19 व्या षटक टाकताना मागच्या तीन सामन्यांमध्ये 49 धावा खर्च केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकासाठी टीम इंडियाची घोषणा; महाराष्ट्राची ही खेळाडू दाखवणार दम
‘एवढ्या धावा केल्या, तरीही…’, कर्णधार रोहितने ‘यांच्या’ डोक्यावर फोडले पराभवाचे खापर
क्रिकेटशी जवळचे नाते असणारे राजू श्रीवास्तव; निधनानंतर भारतीय खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली