भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि उभय संघातील कसोटी मालिका बुधवारी (14 डिसेंबर) सुरू झाली. या पहिल्या कसोटी सामन्याच्या भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने 6 बाद 278 धावा केल्या. चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांचे योगदन सर्वात महत्वाचे राहिले. तर बांगलादेशी खेळाडूंनी देखील कसलेली गोलंदाजी केली.
भारतीय संघाचा अनुभवी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) या सामन्यात संघात पुनरागमन करू शकला. त्याने पहिल्या दिवशी 203 चेंडूत 90 धावांची खेळी केली. यादरम्यान 11 चौकार मारले. पुजारा या सामन्यात शतक पूर्ण करेल अशी अनेकांना, अपेक्षा होती. पण तो पुन्हा एकदा शतकापासून खूप कमी अंतर असताना बाद झाला. पुजाराच्या साथीने श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) देखील मोठी खेळी करू शकला. दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रेयस अय्यर 169 चेंडूत 82 धावा करून नाबाद होता. पुजारा आणि श्रेयसने 317 चेंडूत 149 धावांची भागीदारी केली.
एकदिवसीय मालिकेत संघातून बाहेर असलेल्या रिषभ पंत (Rishabh Pant) याला कसोटी मालिकेत पुन्हा संघात सहभागी करून घेतले गेले. पंतने संघात पुनरागमन करताच प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा बनवली आणि 46 धावांची महत्वपूर्ण खेळी देखील केली. नियमित कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे या सामन्यात खेळू शकला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत केएल राहुल (KL Rahul) संघाचे नेतृत्व करत आहे. मात्र पहिल्या डावात तो अवघ्या 22 धावा करून तंबूत परतला.
केएल राहुल आणि शुबमन गिल ही सलामीवीर जोडी संघाला अपेक्षित सुरुवात देऊ सकली नाही. राहुलने 22, तर गिल 40 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. बांगलादेशसाठी तैजूल इस्लाम पहिल्या दिवशी सर्वाधिक 30 षटके टाकली आणि 84 धावा खर्च करत तीन विकेट्स घेतल्या. मेहदी हसन मिराझने टाकेलल्या 18 षटकांमध्ये 71 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. त्याव्यतिरिक्त खालीद अहमदने 12 षटकांमध्ये 26 धावा दिल्या आणि 1 विकेट घेतली. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी 6 बाद 278 धावांपासून पुढे खेळेल. श्रेयस अय्यर खेळपट्टीवर नाबाद आहे, तर संघाकडे रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज या चार विकेट्सही शिल्लक आहेत. (IND vs BAN 1st test day one update.)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नशीब असावं तर असं! क्लिन बोल्ड होऊनही बाद झाला नाही श्रेयस अय्यर, पाहा व्हिडीओ
धोनीनंतर रिषभ पंतच करू शकलाय ‘अशी’ कामगिरी, बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत झाला मोठा विक्रम