भारताने दुसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटीच्या पाचव्या आणि शेवटच्या दिवशी बांग्लादेशला दुसऱ्या डावात 146 धावांत गुंडाळून मालिका 2-0 ने जिंकली. पहिल्या डावात 52 धावांची आघाडी असलेल्या भारताला बांग्लादेशवर विजयासाठी 95 धावांची गरज होती. जी भारताने तीन विकेट्स गमावून पूर्ण केली. या विजयासह डब्ल्यूटीसी गुणतालिकेत अव्वल स्थानावर असलेल्या भारताचे 11 सामन्यांतून 8 विजय, दोन पराभव आणि एक ड्रॉसह 98 गुण झाले आहेत. जे 74.24 टक्के आहेत. ऑस्ट्रेलिया 12 सामन्यांत 8 विजय, तीन पराभव आणि एक ड्रॉसह 90 गुणांसह 62.50 टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 18 पैकी 12 सामने जिंकले आहेत. यासह, रोहित शर्मा आता 66.66 च्या सर्वोच्च विजयाच्या टक्केवारीसह सर्वात कमी सामन्यांमध्ये कर्णधार बनून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात पहिल्या स्थानावर आहे. बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयासह रोहित शर्माने डब्ल्यूटीसी इतिहासातील विराट कोहलीचा कर्णधार म्हणून 63.63 विजय टक्केवारीचा विक्रम मोडून कसोटी क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
डब्ल्यूटीसी इतिहासात कर्णधाराने सर्वाधिक विजयाची टक्केवारी (किमान 10 कसोटीत कर्णधार)
66.66 – रोहित शर्मा (18 कसोटीत 12 विजय)
63.63 – विराट कोहली (22 कसोटीत 14 विजय)
62.50 – बेन स्टोक्स (24 कसोटीत 15 विजय)
60.71 – पॅट कमिन्स (28 कसोटीत 17 विजय)
डब्ल्यूटीसीच्या इतिहासातील विजयाच्या टक्केवारीनुसार कर्णधार रोहित पहिल्या स्थानावर आहे आणि यासोबतच जागतिक क्रिकेटमधील सध्याच्या कर्णधारांमध्ये इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स देखील रोहितच्या या नवीन विक्रमाच्या जवळ आहेत.
हेही वाचा-
हत्येचा गुन्हा असलेला शाकिब बांगलादेशात परतणार नाही? या देशात स्थायिक होण्याची शक्यता
टीम इंडियाला धक्का! पुनरागमन करण्यापूर्वी स्टार खेळाडू पुन्हा जखमी
‘थाला’ची क्रेझ! धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्याचा 1200 कि.मी सायकल प्रवास