टीम इंडिया आणि इंग्लंडमधील तिसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आण जडजाने शतके केली आहेत. याबरोबरच पदार्पणवीर सर्फराज खान याची सर्वत्र चर्चा होत आहे. पहिल्याच सामन्यात इंग्लंडला घाम फोडला होता. तसेच सर्फराज खान भारतीय संघात प्रवेश मिळवण्यासाठी बरेच दिवस खूप मेहनत करत होता. याबरोबरच, प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी देखील सर्फराजचं कौतुक करत त्याच्या वडिलांना एक खास गिफ्ट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून नौशाद खान यांना थार भेट देणार असल्याचे प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सांगितले आहे. याबरोबरच आनंद महिंद्रा हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. तसेच सोशल मीडियावर आनंद महिंद्रा यांनी व्हिडीओ पोस्ट करत म्हंटलं आहे की, “धीर सोडू नकोस, बस्स! कठोर परिश्रम, धैर्य आणि संयम… वडील आपल्या मुलाला प्रेरणा देण्यासाठी काय करू शकतात? याचं हे ताजं उदाहरण आहे. नौशाद खान हे स्वत: एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी आमच्याकडून थार ही गाडी भेट म्हणून स्विकारावी ही विनंती.” असे ट्विट आनंद महिंद्रा यांनी केलं आहे.
याबरोबरच, अनिल कुंबले यांच्याकडून सरफराज खान याला डेब्यू कॅप मिळाल्यानंतर वडील नौशाद खान भावुक झाले होते. तसेच पहिल्याच सामन्यात सरफराज खान याने 62 धावांची खेळी केली. रनआऊट झाल्याने धावांना ब्रेक लागला पण आपल्या फटकेबाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तसेच सरफराज खान याचा इथपर्यंतचा प्रवास काही साधासोपा नव्हता.
https://twitter.com/anandmahindra/status/1758397400400719941
दरम्यान, भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्यानंतर इंग्लंडने देखील चोख प्रत्युत्तर दिलं. त्यांनी दुसऱ्या दिवस अखेर पहिल्या डावात 2 बाद 207 धावा केल्या. बेन डकेटने तर 118 चेंडूत 133 धावा चोपल्या. इंग्लंड अजूनही 238 धावांनी पिछाडीवर आहेत.
महत्वाच्या बातम्या –