भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या कसोटी सामन्याची सुरुवात गुरुवारी (२५ नोव्हेंबर) झाली. संघाचे नियमित सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुलच्या अनुपस्थितीत मयंक अगरवाल आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केले. गिलने सामन्याच्या पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी केली. ५२ धावा करून कायले जेमिसनच्या गोलंदाजीवर तो त्रिफळाचित झाला. दुपारच्या जेवणानंतर टाकलेल्या पहिल्याच षटकात जेमिसनने ही कामगिरी गेली होती. मात्र, आता गिलने देखील उत्कृष्ट गोलंदाजीसाठी जेमिसनचे कौतुक केले आहे.
गिलने जेमिसनच्या रिवर्स स्विंग चेंडूचे कौतुक करताना म्हटले की, त्याने जेवणानंतर खूप चांगली गोलंदाजी केले. अनेकदा हे माहीत करून घेणे अवघड असते चेंडू आता रिवर्स स्विंग येईल. मला नव्हते वाटले की, एवढ्या लवकर रिवर्स स्विंग मिळेल. पुढे बोलताना तो म्हणला, “कसोटी क्रिकेटमध्ये असेच होते. तुम्हाला परिस्थितीचा अंदाज लवकरात लवकर लावायचा असतो. या डावाता मी चेंडूला त्याप्रकारे अंदाज लावू शकलो नाही.” पहिल्या दिवसाच्या संपूर्ण खेळात गिलने न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांचा चांगल्या प्रकारे सामना केला आणि त्याचे श्रेय भारतीय फिरकी गोलंदाजांना दिले. याबाबत तो म्हणाला की, “जर नेट्समध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळत असाल, तर खूप फायदा मिळतो. अशात निर्णायक क्षणांमध्ये टिकून खेळता येते.”
भारतीय संघाच्या तीन विकेट्स पडल्यानंतर या सामन्यातून कसोटी पदार्पण करणाऱ्या श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरला. यासाठी गिलने अय्यरचेही कौतुक केले. गिल मोठ्या काळानंतर प्रेक्षकांसमोर खेळत आहे आणि तरीदेखील तो आनंदी आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, “नक्कीच चांगले वाटत आहे की, एवढ्या काळानंतर प्रेक्षकांसमोर खेळलो. मी माझ्या कसोटी संघासाठी, भारत ए संघासाठी डावाची सुरुवात केली आहे आणि मध्यक्रमातही खेळलो आहे. ही पद्धतीपेक्षा जास्त मानसिकतेची गोष्ट आहे.” संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनात गिल यापूर्वी १९ वर्षाखालील संघात खेळला आहे. त्याने या सामन्यात पुन्हा एकदा द्रविडचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे आनंद व्यक्त केला.
दरम्यान, कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारतीय संघाने चार विकेट्सच्या नुकसानावर २५८ धावा केल्या. श्रेयस अय्यर (७५) आणि रवींद्र जडेजाने (५०) यांनी नाबाद अर्धशतके केली. भारतातने १४५ धावा असताना चार विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, त्यानंतर अय्यर आणि जडेजाने शतकी खेळी केली आणि संघ अपेक्षित धावसंख्येपर्यंत पोहोचू शकला. जडेजा आणि अय्यर दोघेही नाबाद आहेत. न्यूझीलंडसाठी जेमिसनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. तसेच टिम साउदीनेही एक विकेट घेतला.