आशिया चषक 2023 स्पर्धेत शनिवारी (दि. 2 सप्टेंबर) सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष कट्टर प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान संघातील सामन्यावर होते. या सामन्यात भारतीय संघाला आपला डाव पूर्ण खेळता आला, पण पाकिस्तान संघ पावसाच्या व्यत्ययामुळे एकही चेंडू खेळू शकला नाही. दोन्ही संघांच्या परस्पर संमतीने सामना रद्द झाल्याचे घोषित करण्यात आले. या सामन्यात भारतीय डाव सुरू असतानाच एका गाण्याने सर्वांचे लक्ष वेधले. आता यादरम्यानचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
नेमकं काय झालं?
झालं असं की, श्रीलंकेच्या पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडिअम येथे भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघातील सामना रंगला होता. भारतीय संघ एकीकडे धावांसाठी संघर्ष करत होता. मात्र, यादरम्यान स्टेडिअममध्ये ‘राम सिया राम’ (Ram Siya Ram) हे गाणे वाजू लागले. हे गाणे ‘आदिपुरुष’ सिनेमातील आहे. आता या गाण्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली असून नेटकरी या गाण्याचे सामन्यातील व्हिडिओ जोरदार व्हायरल करत आहेत.
ट्विटरवर व्हायरल
एका युजरन व्हिडिओ शेअर करत लिहिले, “राम सिया राम… मन जिंकले.”
राम सिया राम 🎶
दिल जीत लिया ❤️❤️❤️ जय श्री रामRam Siya Ram Siya Ram Jai Jai Ram Song Playing During Match. #INDvPAK #RamSiyaRamhttps://t.co/fv1zvLekHn
— 𓆩𝕏𝖍𝖚𝖇𝖍𓆪 (@xhubhh) September 2, 2023
दुसऱ्या एकाने लिहिले, “स्टेडिअममध्ये वाजतंय राम सिया राम सिया राम. अद्भूत दृश्य.”
स्टेडियम में गूंज रहा है राम सिया राम सिया राम 🚩
अद्भुत आलोकमय दृश्य pic.twitter.com/Gwq5RI6teW
— SUDHIR (@seriousfunnyguy) September 2, 2023
आणखी एकाने लिहिले, “भारत-पाकिस्तान मॅचदरम्यान ‘राम सिया राम’ गाणं वाजत आहे. वाह मस्तच. जय श्री राम.”
भारत पाकिस्तान मॅच दरम्यान " राम सीया राम " गान वाजत आहे .
वाह मस्तच 😍😍😍😍
जय श्री राम 🚩🙏#INDvPAK #AsiaCup23 #AsiaCup2023 pic.twitter.com/TzH26K4PSP— सागर अशोकराव करपे ( Modi Ka Parivar ) (@SagarKarape123) September 2, 2023
एकाने असेही लिहिले, “श्रीलंकेत भारत-पाकिस्तान सामन्यात हार्दिक पंड्याच्या प्रत्येक चौकारानंतर ‘राम सिया राम’ गाणे वाजले.” अशाप्रकारे भारतीय फलंदाजीदरम्यान श्रीलंकेत वाजत असलेल्या या भारतीय गाण्यांवर चाहते जल्लोष करताना दिसले.
Ram Siya Ram Song from #Prabhas's #Adipurush was Played after Every Boundary by Hardik during #INDvPAK, that too in Sri Lanka.pic.twitter.com/zAVSbjXlpB
— Hail Prabhas (@HailPrabhas007) September 2, 2023
ईशान-हार्दिकची शानदार भागीदारी
सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा 11, शुबमन गिल 10 आणि विराट कोहली 4 धावांवर तंबूत परतले. श्रेयस अय्यरलाही फार चांगली कामगिरी करता आली नाही. तोसुद्धा 14 धावा करून बाद झाला. त्यानंतर ईशान किशन आणि हार्दिक पंड्या यांनी पाचव्या विकेटसाठी 138 धावांची शानदार भागीदारी रचली. यावेळी किशनने 81 चेंडूत 82, तर पंड्याने 90 चेंडूत 87 धावा केल्या. त्यांच्या भागीदारीमुळे भारताला 266 धावांपर्यंत मजल मारता आली. पाकिस्तानकडून गोलंदाजी करताना शाहीन आफ्रिदीने 4, नसीम शाह आणि हॅरिस रौफ यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. (IND vs PAK asia cup 2023 ram siya ram song played in pallekele stadium viral on social media)
हेही वाचा-
‘भारताने सामना जिंकाला असता’, फक्त करावी लागली असती ‘ही’ कामगिरी; दिग्गज खेळाडूने केले स्पष्ट
रोहित-विराटच्या विकेटमुळे भारतीयांचा जीव पडलेला भांड्यात, पण पाकिस्तानी दिग्गज म्हणतोय, ‘बरंच झालं…’