विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिकेत आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्याची कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळायची आहे. कसोटी मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबर (बॉक्सिंग डे) पासून खेळला जाणार आहे. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा सराव जोमात सुरू आहे. दरम्यान खेळाडूंना संध्याकाळच्या वेळी एकत्र मजा करताना पाहिले गेले आहे. भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल (mayank agarwal) याने रात्रीच्या वेळी संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) यांच्यासोबतचे खास फोटो शअर केले आहेत.
भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली संघ आगामी मालिकेसाठी जोमात सराव करत आहे. अशात राहुल द्रविड यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे की, खेळाडूंचा ताण कसा कमी करायचा आणि त्यांच्यासोबत कसे चांगले संबंध बनवायचे. याच धर्तीवर द्रविड खेळाडूंसोबत चांगला वेळ घालवण्याच्या प्रयत्नात दिसत आहे.
मयंक अगरवालने शेअर केलेल्या फोटोत खेळाडू बीबीक्यू नाईटचा आनंद घेताना दिसत आहेत. अगरवालने या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, “एका ज्वलंत बीबीक्यू नाईटसारखे काहीच नाही.” सोबतच त्याने आगेचे इमोजी देखील दिले आहे.
Nothing like a fiery BBQ night 🔥 pic.twitter.com/0S7h7be5ni
— Mayank Agarwal (@mayankcricket) December 21, 2021
भारताला मालिकेतील पहिला सामना २६ डिसेंबरपासून खेळायचा आहे आणि या सामन्यात संघ चांगले प्रदर्शन करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताने आतापर्यत दक्षिण अफ्रिका दौऱ्यात एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. पण यावेळी संघ हा दुष्काळ संपवू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
तो येथील परिस्थितीत घातक ठरेल; द. आफ्रिकेच्या कर्णधाराला वाटतेय भारताच्या ‘या’ गोलंदाजाची भीती
दक्षिण अफ्रिका संघात मागच्या काही वर्षात अनेक बदल झाले आहेत आणि त्यांच्या संघात अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवते. अशात भारतीय संघ त्यांच्यावर वर्चस्व निर्माण करू शकतो. सोबत भारताच्या वेगवान गोलंदाजांना दक्षिण अफ्रिकेच्या परिस्थितीत फायदा होईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यातली भारताचा कसोटी संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज.
स्टॅन्डबाय खेळाडू –
नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चाहर, अर्जन नागवासवाला.
महत्वाच्या बातम्या –
‘हे’ आहेत वर्ष २०२१ चे टॉप-१० टी२० फलंदाज, यादीत पाकिस्तानींचा बोलबाला; तर एकही नाही भारतीय
आयएसएल: एटीके मोहन बागानचा नॉर्थ ईस्ट युनायटेडवर निसटता विजय; ह्युगो बॉमॉस ठरला मॅचविनर
रूटच्या डोक्यावरून सरकला नंबर १ चा ताज, कोहलीचेही नुकसान; ‘हा’ खेळाडू अव्वल स्थानी
व्हिडिओ पाहा –