भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिका सोमवारी (१४ मार्च) संपली. मालिकेतील दुसरा कसोटी सामना १२ मार्चपासून सुरू झाला होता आणि तिसरा दिवस पूर्ण होण्याआधीच भारताने विजय मिळवला. मलिकेतील भारताचा हा सलग दुसरा विजय होता आणि श्रीलंका संघाला क्लीन स्वीप (२-०) मिळाला आहे. मायदेशीत खेळताना कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अप्रतिम प्रदर्शन करत आहे.
भारतीय संघाने (Team India) मायदेशात खेळलेल्या त्याच्या शेवटच्या १५ कसोटी मालिकांचा विचार केला, तर त्यापैकी एकही मालिका संघाने गमावली नाहीय. मायदेशात खेळलेल्या मागच्या सलग १४ कसोटी मालिका भारताने जिंकल्या होत्या. आता श्रीलंका संघाला पराभूत करून मायदेशीतील सलग १५ वी कसोटी मालिकाही भारताने स्वतःच्या नावावर केली आहे. एकंदरित पाहता भारतीय संघाला मायदेशात पराभूत करणे कठीण होऊन बसले आहे.
मायदेशात सर्वाधिक सलग कसोटी मालिका जिंकण्याच्या बाबतीत भारतीय संघ अव्वल क्रमांकावर आहे. भारताच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलिया आहे. ऑस्ट्रेलियाने १९९४ ते २००० दरम्यान आणि २००४ ते २००८ दरम्यान प्रत्येकी १० कसोटी मालिका सलग मायदेशात जिंकल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार केला, तर मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही सामन्यांमध्ये भारताने सोपा आणि मोठा विजय मिळला. पहिल्या सामन्यात श्रीलंका संघ तब्बल एक डाव आणि २२२ धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर सोमवारी (१४ मार्च) दुसऱ्या कसोटीतही भारताने तब्बल २३८ धावांनी विजय मिळवला. श्रीलंका संघासाठी भारताचा हा दौरा खूपच निराशाजन राहिला.
या दौऱ्यात श्रीलंका संघाने दोन सामन्यांची कसोटी आणि तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली. या दोन्ही मालिकांमधील एकही सामना श्रीलंकन संघ जिंकू शकला नाही. टी-२० आणि कसोटी दोन्ही मालिकांमध्ये भारताने त्यांना क्लीन स्वीप दिला आहे. भारतीय संघाचे प्रदर्शन दोन्ही मालिकांमध्ये अप्रतिम राहिले.
कसोटी मालिकेत रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराह यांचे प्रदर्शन कौतुकास पात्र ठरले होते. पहिल्या कसोटी सामन्यात जडेजाने नाबाद १७५ धावा केल्या होत्या, तसेच ९ विकेट्सही घेतल्या होत्या. यासाठी त्याला सामनावीर निवडले गेले होते. तसेच दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरने ९२ आणि ६७ धावांची महित्वाची खेळी केली. या प्रदर्शनासाठी दुसऱ्या सामन्यात श्रेयसला सामनावीर निवडले गेले. रिषभ पंतने संपूर्ण मालिकेत चांगलेे प्रदर्शन केले आणि त्याला मालिकावीर निवडले गेले.
महत्वाच्या बातम्या –
कोहलीसोबत सेल्फी घेण्यासाठी मैदानावर धावलेल्या फॅन्सबाबत मोठी अपडेट, पोलिसांनी केलीये कडक कारवाई
विषय गंभीर, कॅप्टन रोहित खंबीर! प्रतिस्पर्ध्यांना व्हाईट वॉशचा दणका देत रचलेत विक्रमांचे मनोरे, वाचा