---Advertisement---

IND vs USA: गंभीरचा एक मेसेज अन् सूर्याने सामना फिरवला, कर्णधाराने सांगितला टर्निंग पॉइंट

On: रविवार, फेब्रुवारी 8, 2026 4:08 PM
---Advertisement---

या टी२० विश्वचषकात सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून विक्रमी पदार्पण केले. सलामी सामन्यात त्याने भारताला शानदार विजय मिळवून दिला. कर्णधार म्हणून आपल्या पहिल्याच सामन्यात सूर्याने अमेरिकेविरुद्ध भारताला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने स्पर्धेची विजयी सुरुवात केली. शिवाय टी२० विश्वचषकातील हा भारताचा सलग नववा विजय होता.

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (जे सूर्याचे घरचे मैदान आहे) भारतीय संघ १२.४ षटकांत केवळ ७७ धावांत ६ गडी गमावून अडचणीत सापडला होता. मात्र, या महत्त्वाच्या क्षणी सूर्यकुमार यादवने जबाबदारी स्वीकारली. ज्यात त्याने एककी झुंज दिली. सूर्याने नाबाद ८४ धावांची खेळी करत भारताला ९ गडी गमावून १६१ धावांपर्यंत पोहोचवले.

१६२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेचा संघ केवळ १३२ धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने अमेरिकेचा सलग दुसऱ्यांदा पराभव केला.

सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या भावना व्यक्त केल्या, त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने दिलेल्या सल्ल्याचा उल्लेख केला. “अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात खूप दबाव होता. पण गौतम गंभीर यांनी मला दबावाखाली शांत राहण्याचा सल्ला दिला, ज्याचा मला खूप फायदा झाला,” असे सूर्या म्हणाला.

ड्रिंक्स ब्रेकदरम्यान गंभीर यांनी दिलेल्या सल्ल्याची आठवण करून देताना सूर्या म्हणाला, “गौतम भाईंनी मला शेवटपर्यंत फलंदाजी करत राहण्यास सांगितले, त्यानंतर धावा लवकर होतील असे सांगितले. त्यांनी हे देखील स्पष्ट केले की या खेळपट्टीवर १८०-१९० धावा करणे शक्य होणार नाही, १४०-१५० धावा पुरेसे असतील.”

आपल्या आत्मविश्वासाबद्दल बोलताना सूर्यकुमार म्हणाला, “७७ धावांत ६ गडी गमावल्यानंतरचा दबाव शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. पण मी यापूर्वीही अशा परिस्थितीत फलंदाजी केली आहे. आझाद मैदान, क्रॉस मैदान आणि मुंबईतील इतर मैदानांवर खूप क्रिकेट खेळल्यामुळे, मला आत्मविश्वास होता की जर मी शेवटपर्यंत टिकून राहिलो, तर मी फरक घडवू शकेन.”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---