इंग्लंड आणि वेल्स येथे पुढील महिन्यात सुरु होणाऱ्या आयसीसी विश्वचषकासाठी आज 15 जणांच्या भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे असणार आहे, तर उपकर्णधारपद रोहित शर्माकडे असणार आहे.
या भारतीय संघात विराट आणि रोहित सह शिखर धवन, केएल राहुल, दिनेश कार्तिक,केदार जाधव, एमएस धोनी, हार्दिक पंड्या, विजय शंकर, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी यांना संधी मिळाली आहे.
हा भारताचा अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनीचा चौथा विश्वचषक असून तो या संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. त्याचबरोबर कर्णधार विराटचा हा तिसरा विश्वचषक असून रोहित, शिखर, जडेजा, भुवनेश्वर आणि शमी यांचा दुसरा विश्वचषक असणार आहे. त्याचबरोबर अन्य खेळाडू पहिल्यांदाच विश्वचषक खेळणार आहेत.
या विश्वचषकात खेळणाऱ्या खेळाडूंची कामगिरी –
1. विराट कोहली (कर्णधार) –
एकूण वनडे सामने – 227
धावा – 10843
सरासरी – 59.57
शतके/अर्धशतके – 41/49
सर्वोच्च कामगिरी – 183 धावा
विश्वचषकातील कामगिरी –
सामने – 17, धावा – 587, शतके/अर्धशतके – 2/1
2. रोहित शर्मा (उपकर्णधार) –
एकूण वनडे सामने – 206
धावा – 8010
सरासरी – 47.39
शतके/अर्धशतके – 22/41
सर्वोच्च कामगिरी – 264 धावा
विश्वचषकातील कामगिरी –
सामने – 8, धावा – 330, शतके/अर्धशतके – 1/2
3. शिखर धवन –
एकूण वनडे सामने – 128
धावा – 5355
सरासरी – 44.62
शतके/अर्धशतके – 16/27
सर्वोच्च कामगिरी – 143 धावा
विश्वचषकातील कामगिरी –
सामने – 8, धावा – 412, शतके/अर्धशतके – 2/1
4. केएल राहुल –
एकूण वनडे सामने – 14
धावा – 343
सरासरी – 34.30
शतके/अर्धशतके – 1/2
सर्वोच्च कामगिरी – 100* धावा
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.
5. दिनेश कार्तिक –
एकूण वनडे सामने – 91
धावा – 1738
सरासरी – 31.03
शतके/अर्धशतके – 0/9
सर्वोच्च कामगिरी – 79 धावा
विश्वचषकातील कामगिरी – एकाही विश्वचषकात सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.
6. केदार जाधव
एकूण वनडे सामने – 59
धावा – 1174
सरासरी – 43.48
शतके/अर्धशतके – 2/5
सर्वोच्च कामगिरी – 120 धावा
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.
7. एमएस धोनी
एकूण वनडे सामने – 341
धावा – 10500
सरासरी – 50.72
शतके/अर्धशतके – 10/71
सर्वोच्च कामगिरी – 183* धावा
विश्वचषकातील कामगिरी –
सामने – 20, धावा – 507, शतके/अर्धशतके – 0/3
8. हार्दिक पंड्या –
एकूण वनडे सामने – 45
धावा – 731
सरासरी – 29.24
शतके/अर्धशतके – 0/4
विकेट – 44
सर्वोच्च कामगिरी – 83 धावा, 31 धावांत 3 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही
9. विजय शंकर –
एकूण वनडे सामने – 9
धावा – 165
सरासरी – 33
शतके/अर्धशतके – 0/0
सर्वोच्च कामगिरी – 46 धावा
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही
10. रविंद्र जडेजा –
एकूण वनडे सामने – 151
धावा – 2035
सरासरी – 29.92
शतके/अर्धशतके – 0/10
विकेट – 174
सर्वोच्च कामगिरी – 87 धावा, 36 धावांत 5 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – सामने 8, धावा- 57, विकेट्स – 9
11 . कुलदीप यादव-
एकूण वनडे सामने – 44
विकेट्स – 87
एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा
सर्वोच्च कामगिरी – 25 धावांत 6 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.
12. युजवेंद्र चहल –
एकूण वनडे सामने – 41
विकेट्स – 72
एका डावात 5 विकेट्स – 2 वेळा
सर्वोच्च कामगिरी – 42 धावांत 6 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.
13. जसप्रीत बुमराह –
एकूण वनडे सामने – 49
विकेट्स – 85
एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा
सर्वोच्च कामगिरी – 27 धावांत 5 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – अजून एकही विश्वचषक खेळलेला नाही.
14. भुवनेश्वर कुमार –
एकूण वनडे सामने – 105
विकेट्स – 118
एका डावात 5 विकेट्स – 1 वेळा
सर्वोच्च कामगिरी – 42 धावांत 5 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – सामने 1, विकेट्स – 1
15. मोहम्मद शमी –
एकूण वनडे सामने – 63
विकेट्स – 113
एका डावात 5 विकेट्स – 0 वेळा, एका डावात 4 विकेट्स – 6 वेळा
सर्वोच्च कामगिरी – 35 धावांत 4 विकेट्स
विश्वचषकातील कामगिरी – सामने 7, विकेट्स – 17
विश्वचषक २०१९साठी टीम इंडियाची घोषणा. असा आहे संघ- विराट(कर्णधार), रोहित, शिखर, राहुल, विजय शंकर, धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, चहल, कुलदीप यादव, भुवी, बुमराह, हार्दिक पंड्या, जडेजा, शमी #म #मराठी pic.twitter.com/YqOrt4kxDj
— Maha Sports (@Maha_Sports) April 15, 2019