---Advertisement---

श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, पुणेकर ऋतूराज गायकवाडला मिळाले स्थान; पाहा कोण झालंय कर्णधार

On: गुरूवार, जून 10, 2021 10:31 PM
---Advertisement---

भारताचा मर्यादीत षटकांचा क्रिकेट संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ वनडे आणि ३ टी२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकांसाठी गुरुवारी (१० जून) भारतीय संघाची घोषणा झाली आहे.

या दौऱ्यासाठी शिखर धवनकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. तर उपकर्णधारपद भुवनेश्वर कुमारकडे देण्यात आले आहे. तसेच देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, नितीश राणा, चेतन सकरिया आणि कृष्णप्पा गॉथम या खेळाडूंना पहिल्यांदाच भारतीय संघात संधी मिळाली आहे. या खेळाडूंनी आयपीएल २०२१ स्थगित होण्यापूर्वी आपल्या खेळाडूने प्रभावित केले होते.

त्याचबरोबर पृथ्वी शॉ, मनिष पांडे आणि संजू सॅमसन यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी फिटनेस टेस्टमध्ये अनुउत्तीर्ण झाल्याने भारतीय संघातील जागा गमवावी लागलेल्या वरुण चक्रवर्तीलाही या संघात संधी मिळाली आहे.

त्याचबरोबर नेट गोलंदाज म्हणून इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग यांची निवड झाली आहे. या दौऱ्यात भारतीय संघाचे प्रशिक्षकपद राहुल द्रविड सांभाळणार आहे.

या दौऱ्यात ३ टी२० सामन्यांची आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. हा दौरा १३ ते २५ जुलै दरम्यान होईल. आधी वनडे मालिका खेळवली जाईल. त्यानंतर टी२० मालिका होईल. वनडे मालिकेतील सामने अनुक्रमे १३, १६ आणि १८ जुलै रोजी होतील; तर टी२० मालिकेतील सामने २१, २३ आणि २५ जुलै रोजी होतील. हे सर्व सामने कोलंबोमध्ये होणार आहेत.

या मालिका सुरु असताना भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर असणार आहे. इंग्लंड दौऱ्यात भारताला १८ ते २२ जून दरम्यान साऊथॅम्पटन येथे कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर भारताला ४ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर दरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका इंग्लंडमध्ये खेळायची आहे.

त्यामुळे या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचे प्रमुख खेळाडू व्यस्त असणार आहेत. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा अशा काही खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळे हे खेळाडू श्रीलंका दौऱ्यासाठी उपलब्ध असणार नाहीत. अशा परिस्थितीत श्रीलंका दौऱ्यासाठी युवा खेळाडूंना भारताच्या मर्यादीत षटकांच्या संघात स्थान दिले आहे. तसेच विराट आणि रोहितच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ- शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शाॅ, देवदत्त पड्डिकल, ऋतुराज गायकवाड, सुर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), राहुल चाहर, के गाॅथम, कृणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुनवेश्वर कुमार (उपकर्णधार) दिपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकरिया.

नेट गोलंदाज – इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर आणि सिमरजीत सिंग

असा असेल भारताचा श्रीलंका दौरा

वनडे मालिका –
१३ जुलै – पहिला वनडे सामना, कोलंबो
१६ जुलै – दुसरा वनडे सामना, कोलंबो
१८ जुलै – तिसरा वनडे सामना, कोलंबो

टी२० मालिका – 
२१ जुलै – पहिला टी२० सामना, कोलंबो
२३ जुलै – दुसरा टी२० सामना, कोलंबो
२५ जुलै – तिसरा टी२० सामना, कोलंबो

महत्त्वाच्या बातम्या –

‘मला २००७ टी२० विश्वचषकावेळी कर्णधारपदाची आशा होती, पण धोनी कर्णधार झाला’, युवराजचा खळबळजनक खुलासा

मोठी बातमी! ऑलिंपिक २०३२ चे आयोजन होऊ शकते ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ शहरात; पुढील महिन्यात होणार घोषणा

एकेकाळी भूक भागवण्यासाठी केली होती चोरी, आज राहतो कोट्यवधी रुपयांच्या घरात; वाचा गेलची संघर्षमय कहाणी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---