क्रिकेट असोसिएशन ऑफ द ब्लाइंड इन इंडिया (CABI) ने आयोजित केलेल्या क्रिकेट मालिकेत भारतीय दृष्टीहीन क्रिकेट संघाच्या फलंदाजांनी शानदार कामगिरी करून दाखवली. बुधवारी (२९ डिसेंबर) झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने बांगलादेशला तब्बल १७७ धावांनी पराभूत केले. भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश मिळवले.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर भारतीय कर्णधाराने प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारतीय संघाने दुर्गा रावच्या ११३ चेंडूत १७३ आणि कर्णधार सुनील रमेशच्या ७६ चेंडूतील १७७ धावांच्या जोरावर ४० षटकात तब्बल ४६६ धावांचा डोंगर उभा केला.
भारतीय संघाने दिलेले भले मोठे आव्हान विरोधी बांगलादेश संघाला पेलवले नाही. भारतीय संघाच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे बांगलादेश संघ फक्त २८९ धावच करू शकला. यामध्ये अब्दुल मलिक यांनी १२९ चेंडूत १३८ धावांची खेळी केली. आपल्या शानदार शतकी खेळीसाठी दुर्गा राव याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या मालिकेचे आयोजन क्रिकेट असोसिएशन ऑफ द ब्लाइंड्स इंडिया यांनी केले होते. मालिकेतील सर्व सामने भोपाळ येथे खेळले गेले.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघातून बाहेर करण्याबद्दल अखेर हरभजनने मौन सोडले म्हणाले, “मी एमएस धोनीला…” (mahasports.in)
‘या’ कारणामुळे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार पराभूत होऊनही आहे खुश, वाचा काय म्हणाला.. (mahasports.in)
Year Ending 2021 | ‘ही’ आहे कसोटी क्रिकेटमधील २०२१ ची सर्वात फ्लॉप ‘प्लेइंग इलेव्हन’ (mahasports.in)