क्रिकेटमध्ये नेहमीच काहीना काही गोष्टी घडत असतात. त्यातील काही इतक्या मजेशीर असतात की प्रेक्षकांमध्ये तो एक चर्चेचा विषय ठरतो. असाच काहीसा किस्सा सध्या चालू असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारताच्या पहिल्या कसोटी सामन्यात घडला.
पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत पाहुण्या भारतीय संघाला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. पहिल्या डावात जेव्हा ४९ व्या षटकात मोहम्मद शमी गोलंदाजीसाठी आला, तेव्हा मोहम्मद सिराजने असे काही केले की ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान वायरल होतोय.
झाले असे की, गोलंदाजी करताना शमी जेव्हा ‘रनअप’ घेण्यासाठी जात होता, तेव्हा सिराजने चेंडू चमकवण्यासाठी चक्क शमीच्या डोक्यातील घामाचा वापर केला. त्यामुळे या व्हिडिओला पाहून क्रिकेट चाहत्यांमध्ये हशा उडाल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे खेळाडू चेंडू चमकवण्यासाठी शरिरावरील घामाचा वापर करत असतात.
https://twitter.com/PrabS619/status/1423562730351448064
दरम्यान, पहिल्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर फिके पडले. इंग्लंडचा कर्णधार जो रूटची अर्धशतकी खेळी सोडली तर, इतर कोणताही खेळाडू भारतीय गोलंदाजांसमोर फार काळ टिकू शकला नाही. पहिल्या डावात इंग्लंडचा पूर्ण संघ १८३ धावाच बनवू शकला. भारताकडून गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या, तर शमीने ३, शार्दुल ठाकूरने २ आणि सीराजने १ विकेट घेतल्या.
त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली राहिली. पहिल्या विकेटसाठी रोहित शर्मा आणि केएल राहुलने ९७ धावांची भागीदारी केली. मात्र, त्यानंतर भारतीय फलंदाजी कोलमडली. तरी भारताने केएल राहुल आणि रविंद्र जडेजा यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर २७८ धावांपर्यंत मजल मारली. राहुलने ८४ धावांची, तर जडेजाने ५६ धावांची खेळी केली. त्यामुळे भारताने ९५ धावांची आघाडी मिळवली. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या, तर जेम्स अँडरसनने ४ विकेट्स घेतल्या.
महत्वाच्या बातम्या –
–माजी निवडकर्त्याकडून डिव्हिलियर्सवर वर्णभेद केल्याचे गंभीर आरोप; मिस्टर ३६०ने दिले ‘असे’ उत्तर