विराट कोहली (virat kohli) याच्या नेतृत्वातील भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर (south africa tour of india) आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायच्या आहेत. कसोटी मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग डे (२६ डिसेंबर) दिवशी सुरू होणार आहेत. पहिल्या सामन्यापूर्वी भारतीय संघ शनिवारी परिषद घेणार आहे. परंतु कर्णधार विराट कोहली या पत्रकार परिषदेत उपस्थित नसेल, अशी माहिती समोर आली आहे. आता कोहलीच्या अनुपस्थितीत कोण या पत्रकार परिषदेला सामोरे जाणार, हा एक प्रश्न आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (rahul dravid) या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असतील किंवा केएल राहुल (kl rahul) देखील ही जबाबदारी पार पाडू शकतो.
तत्पूर्वी रोहित शर्माने कसोटी मालिकेतून माघार घेतल्यामुळे केएल राहुल या मालिकेत उपकर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे. कर्णधार असल्यामुळे विराट पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणे अपेक्षित होते, पण काही कारणास्तव तो उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी विराट कोहलीने एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेनंतर विराट आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील मतभेद जगासमोर आला होता. यावेळी विराटने गांगुलींनी केलेले एक विधान खोटे असल्याचे स्पष्ट केले होते.
दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा करताना बीसीसीआयने विराटकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून रोहित शर्माकडे सोपवले होते. यानंतर अनेक चर्चा आणि बातम्या समोर आल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर स्पष्टीकरन देताना सौरव गांगुलींनी मोठे विधान केले होते. गांगुलींच्या मते मर्यादित षटकांमध्ये दोन वेगवेगळे कर्णधार असने योग्य नसते आणि त्यांनी विराटला टी-२० संघाचे कर्णधारपद सोडू नको अशी विनंती केली होती. त्यांच्या मते विराटने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे त्याच्याकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद देखील काढून घ्यावे लागले.
परंतु विराटने घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याने स्पष्ट केले होते की, टी-२० संघाचे कर्णधारपद सोडताना त्याच्यासोबत कोणी संवाद साधला नव्हता. तसेच एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी त्याला ही गोष्ट सांगण्यात आली होती. या सर्व घडामोडींनंतर आता संघ व्यवस्थापनाला पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी कसल्याही प्रकारचा वाद नको आहे आणि याच कारणास्तव विराट पत्रकार परिषदेत सहभागी होणार नसल्याचे सांगितले जात आहे.
महत्वाच्या बातम्या –
फिल्म ‘८३’ पाहून मंत्रमुग्ध झाला कर्णधार विराट कोहली; म्हणाला, ‘भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील…’
Video: सामना जिंकण्यासाठी फलंदाजाने केली चीटिंग, पंचांना लक्षात येताच संपूर्ण संघाला ठोठावला दंड
व्हिडिओ पाहा –