भारतीय क्रिकेटमध्ये सध्या सर्वाधिक चर्चा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्या नावाची सुरू आहे. संघाचा सर्वात प्रमुख खेळाडू असलेला बुमराह सातत्याने संघाबाहेर आहे. दुखापतींनी त्याला ग्रासले असून, तो पुनरागमन करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, यामध्ये त्याला सातत्याने अपयश येताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी बुमराह हा सर्वात वेगळा असल्याचे म्हटले आहे.
बुमराह नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार होता. मात्र, अखेरच्या वेळी तो खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना देखील उपलब्ध नसेल. याच मुद्द्यावर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत पारस म्हांब्रे यांना प्रश्न विचारला गेला. यावर उत्तर देताना ते म्हणाले,
“जसप्रीत हा एक वेगळा गोलंदाज आहे. कोणीही त्याची जागा भरून काढू शकत नाही. सध्या तो पुनरागमनाच्या अखेरच्या टप्प्यात असून, तो मैदानात धडाकेबाज पुनरागमन करेल.”
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा वनडे सामना शनिवारी (20 जानेवारी) रायपूर येथे खेळला जाईल.
जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून क्रिकेटच्या मैदानातून बाहेर आहेत. पाठिच्या दुखापतीमुळे बुमराह मोठ्या काळापासून संघातून बाहेर आहे. सप्टेंबर 2022 आधीही बुमराह वारंवार संघातून बाहेर राहिला होता. अशात चाहते त्याला पुन्हा खेळण्यासाठी भारतीय संघाच्या जर्सीत पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दुखापतीमुळे बुमराह मागच्या वर्षी खेळल्या गेलेल्या आशिया चषक व आयसीसी टी20 विश्वचषकात देखील खेळू शकला नव्हता. सध्या तो बेंगलोर येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आपली तंदुरुस्ती सिद्ध करत आहे.
(Indian bowling coach Paras Mhambrey said Bumrah is unique he is irreplaceable)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कुस्तीत खळबळ! महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, आंदोलनाला सुरुवात
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार