भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे बीसीसीआय जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या अंतर्गत येणाऱ्या प्रत्येक क्रिकेटपटूला बराच पैसा मिळतो. त्यातही बीसीसीआय दरवर्षी आयपीएलचे आयोजन करते. त्यामुळे केवळ भारतीय क्रिकेटपूंनांच नाहीतर जगातील सर्व सहभागी क्रिकेटपटूंना यातून चिक्कार पैसा मिळतो. अगदी कोणाला माहित नसलेले क्रिकेटरही आयपीएलमधून मालामाल होतात. डोमेस्टिक क्रिकेटमध्येही खेळाडूंना लाखात पैसे मिळतात. अशात काही क्रिकेटर असे असतात, जे अत्यंत गरीब परिस्थितीतून येतात मेहनत करतात आणि क्रिकेटविश्वातील सितारे बनून जातात. पद प्रतिष्ठा आणि पैसा आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही भारतीय क्रिकेटपटूंविषयी माहिती करून घेऊ, जे अतिशय गरिबीतून येऊन आता कोट्यावधींचे मालक बनले आहे.
एमएस धोनी
या यादीतील पहिले नाव निश्चितच आहे भारताचा माजी कर्णधार कॅप्टन कूल एमएस धोनी (MS Dhoni) याचे. क्रिकेटमुळे त्याचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. त्याचे वडील कोल इंडियात पंप ऑपरेटर म्हणून काम करायचे. त्यांची इच्छा होती की धोनीने चांगली सरकारी नोकरी करावी. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी धोनी तिकीट कलेक्टरही बनला. पण, धोनीचे लक्ष्य फक्त क्रिकेट खेळणे हे असल्याने, त्याने वडिलांच्या स्वप्नांना बाजूला ठेवत आपले स्वप्न पूर्ण करण्याला जास्त महत्त्व दिले. आज तो क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आणि क्रिकेटर म्हणून ओळखला जातो. एक वेळ तो भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटर होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही ना त्याच्या फॅन फॉलोविंगमध्ये कमी आली ना श्रीमंतीत. धोनी आज रोजी हजारो कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.
पठाण बंधू
भारतीय क्रिकेट संघातील पठाण बंधू म्हणजे इरफान पठाण आणि यूसुफ पठाण. त्या दोघांचीही सुरुवातीची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती. त्यांचे वडील हे मशीदमध्ये झाडू मारण्याचे काम करत असायचे. त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की इरफान आणि यूसुफला क्रिकेटपटू बनवायचे. ते दोघे लहान असताना त्यांच्या वडिलांच्या 250 रुपयांवर त्यांचे घर चालायचे, पण पुढे दोन्ही भावांनी क्रिकेटर होण्यासाठी अपार मेहनत केली. तुटकी बॅट आणि शिवून घेतलेले शूज घालून त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर होण्यापर्यंतचा प्रवास केला. दोन्ही भाऊ एकाच वेळी टीम इंडियासाठी खेळले. दोघेही आज इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्त झाले असले तरी, विविध व्यवसाय व क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपये त्यांच्याकडे असल्याचे सांगितले जाते.
रवींद्र जडेजा
सध्या भारतीय संघाचा प्रमुख अष्टपैलू असलेल्या रवींद्र जडेजाची कहाणी खूप प्रेरणादायक आहे. जडेजा क्रिकेट क्षेत्रात येण्यापूर्वी त्याचे वडील सेक्युरिटी गार्डची नोकरी करायचे, तर आई नर्स होती. त्याचे पूर्ण कुटुंब एका सरकारी क्वार्टरमध्ये राहायचे. मोठे नाव कमवायचे म्हणून जडेजाने क्रिकेटर होण्याचे ठरवले. त्याचे हे स्वप्न आज पूर्ण झालंय. तो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू बनलाय. आयपीएलमध्ये एका सीझनचेच खेळण्याचे तो 17 कोटी रुपये कमावतो. तसेच, भारतीय संघाकडून व जाहिरातींद्वारे कमावलेल्या त्याच्या संपत्तीचा आकडा हा शेकडो कोटींच्या पुढे जाईल. तसेच आज त्याच्या घराची किंमतच 10 कोटींपेक्षा जास्त आहे.
हार्दिक पंड्या
हार्दिक पंड्या याचा सर्वसामान्य मुलगा ते क्रिकेटपटू आज टीम इंडियाचा कर्णधार बनेपर्यंतचा प्रवासही खूप रोमांचक होता. तो नेहमी सोशल मीडियाद्वारे त्याच्या कुटुंबाचे जुने फोटो शेअर करत असतो. त्यावरून दिसून येते की त्याचे सुरुवातीचे जीवन खूप संघर्षाने भरलेले होते. पंड्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो लहान असताना त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती खूप वाईट होती. त्यामुळे त्याला आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्याला फक्त मॅगी खाऊन रहावे लागायचे. हार्दिककडे तर त्याचे क्रिकेट किट विकत घेण्याइतकेही पैसे नव्हते. मात्र, दोन्ही भावांनी चिकाटी दाखवत आपली क्रिकेट कारकिर्द साकारली. हार्दिक टीम इंडियाच्या कर्णधारपदापर्यंत पोहोचला. तसेच आयपीएलमधील महागडा खेळाडू आणि आयपीएल विजेता कर्णधारही बनला. आज दोन्ही भावांकडे वडोदरा आणि मुंबई येथे कोट्यावधींची घरे आहेत. दोघेही आपल्या लॅविश लाईफसाठी ओळखले जातात.
उमेश यादव
भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवचे सुरुवातीचे जीवन खूप संघर्षाने भरलेले होते. त्याचे वडील कोळश्याच्या खाणीत काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरी आवश्यक तितका पैसा नसायचा असायची. म्हणून त्याच्या वडिलांची इच्छा होती की उमेशने सरकारी नोकरी करावी. उमेशदेखील पोलीस कॉन्स्टेबल बनण्याची तयारी करत होता. मात्र, पुढे जाऊन त्याने क्रिकेटचे क्षेत्र निवडले. आज उमेशचे नाव सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये नसले तरी तो, कोट्यावधीच्या संपत्तीचा मालक बनला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने टीम इंडिया व आयपीएलमध्ये खेळत असल्याने तो सन्मानपूर्वक जीवन जगतोय.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ 4 दिग्गज जगात चमकले, पण क्रिकेटच्या पंढरीत ठरले अपयशी; यादीत दोन भारतीयांचा समावेश
जेव्हा गोलंदाजीचा बादशाह बॅटिंगमधील ‘किंग’ला नडलेला; मॉडर्न क्रिकेटमधील ‘हा’ किस्सा वाचाच