सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेन, गाबाच्या मैदानावर रंगला आहे. दरम्यान ‘मोहम्मद सिराज’ला (Mohammed Siraj) गाबा कसोटीच्या पहिल्या डावात खास कामगिरी करता आली नाही. दरम्यान सिराजने 2 विकेट्स देखील घेतल्या. पण आता सिराजच्या खराब फॉर्मचा बचाव त्याचा सहकारी स्टार वेगवान गोलंदाज ‘जसप्रीत बुमराह’ने (Jasprit Bumrah) केला आहे.
पहिल्या डावात ‘मोहम्मद सिराज’ला (Mohammed Siraj) फक्त 2 विकेट्स मिळाल्या, तर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) 6 विकेट्स घेतल्या. सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर बुमराह म्हणाला की, सामना संपल्यानंतरही सिराजने ब्रिस्बेनमध्ये गोलंदाजी सुरूच ठेवली. सिराजला माहित होते की, तो बाहेर पडला तर संघावर खूप दबाव येईल.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) म्हणाला, “विकेट आणि इतर सर्व गोष्टींच्या बाबतीत, काही दिवस तो चांगली गोलंदाजी करेल, विकेट्स येतील जसे मी त्याच्याशी आधी बोललो होतो. काही दिवस तो फार चांगली गोलंदाजी करणार नाहीस पण विकेट्स येतील. हे सर्व पैसे बँकेत आहेत. हे मी त्याच्याशी केलेले संभाषण आहे.”
सिराजच्या प्रेरणेबद्दल, बोलताना बुमराह म्हणाला, “तुम्ही असे काही करत आहात जे यापूर्वी अनेकांनी केले नसेल. त्यामुळे मला वाटते की, तो चांगल्या स्थितीत आहे, मला हे माहित आहे. मला माहित नाही की आणखी काय होत आहे. पण त्याचा अॅटीट्यूड हा खूप चांगला आहे, कारण तो आमच्यासाठी खूप सकारात्मक गोष्ट आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘पृथ्वी शाॅ’बद्दल स्टार खेळाडूचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “कोणीही त्याला बेबीसिट…”
IND vs AUS; तुमचा आवडता शाॅट विसरा, माजी खेळाडूचा विराटला सल्ला
गाबा कसोटीत भारतीय फलंदाज फ्लॉप झाल्यानंतर कोच गंभीरनं उचलली बॅट; VIDEO व्हायरल