बँकॉक येथे सुरू असलेल्या एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत बुधवारी (13 जुलै )भारताच्या पदकांचे खाते खोलले गेले. भारताचा लांबपल्ल्याचा धावपटू अभिषेक पाल याने 10,000 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 29:33:26 अशी वेळ नोंदवत कांस्यपदक आपल्या नावे केले. भारताचा गुलबीर सिंग पाचव्या क्रमांकावर राहिला.
सूफचलसाई स्टेडियम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जपानच्या रेन तझावा याने 29:18:44 अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तर, कझाकस्तांच्या कोचने 29:31:63 अशी वेळ नोंदवत रौप्य पदकाची कमाई केली. भारताचा गुलबीर सिंह या स्पर्धेत पाचव्या क्रमांकावर राहिला. भारताची अनुभवी महिला भालाफेकपट्टू अन्नू राणी ही देखील पदक मिळवण्यापासून वंचित राहिली. तिला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. मागील वेळी तिने या स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केली होती.
(Indian Runner Abhishek Pal Won Bronze In Asian Athletics Championship 2023)
महत्वाच्या बातम्या –
भारतीय संघात असे काही पहिल्यांदाच! शुबमन गिलच्या ‘या’ निर्णयामुळे माजी क्रिकेटपटू हैराण
मैदानावर होती विंडीजची शेवटची जोडी, अचानक नाचायला लागला शुबमन; डान्स कॅमेऱ्यात कैद