भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर उभय संघात ५ सामन्यांची टी२० मालिका सुरू आहे. ही मालिका सुरू असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी झिम्बाब्वे दौऱ्यासाठी १५ सदस्यीय वनडे संघाची घोषणा केली आहे. या संघातून नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्यात आली आहे. शिखर धवन याच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची धुरा सोपवण्यात आली आहे.
यापूर्वीही शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळली आणि जिंकलीही होती. या मालिकेतील सहभागी खेळाडूंपैकी बऱ्याच जणांना झिम्बाब्वेविरुद्धही संधी देण्यात आली आहे. तर काही खेळाडूंना मात्र चांगल्या प्रदर्शनानंतर निवडकर्त्यांनी दुर्लक्षित केले आहे. याच खेळाडूंबद्दल आपण या लेखात जाणून घेणार आहोत.
पृथ्वी शॉ-
झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विस्फोटक सलामीवीर पृथ्वी शॉवर पुन्हा एकदा दुर्लक्ष केले गेले आहे. ऋतुराज गायकवाडला सलामीवीर म्हणून या संघात जागा दिली गेली आहे. मात्र मागील काही दौऱ्यात त्याची निवड होऊनही त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा देण्यात आली नव्हती. तरीही निवडकर्ते ऋतुराजपेक्षा पृथ्वी शॉला प्राधान्य देताना दिसत आहेत. शॉने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. तेव्हापासून तो भारतीय संघातून बाहेर आहे.
पृथ्वी शॉला भारतीय संघातील घातक युवा सलामीवीरांमध्ये गणले जाते. तरीही संघ निवडकर्त्यांचा त्याच्यावरील विश्वास कमी होताना दिसत आहे. शॉला आतापर्यंत भारताकडून फक्त १ टी२० सामना खेळण्याची संधी मिळाली आहे, ज्यामध्ये तो शून्य धावेवर बाद झाला होता. अशात वयाच्या २२ वर्षीच पृथ्वी शॉच्या भारतीय संघातील जागेवर धोक्याचे सावट पसरू लागले आहे.
टी नटराजन-
सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करत सर्वांच्या नजरेत येत टी नटराजनने २०२१ मध्ये आंतरराष्ट्रीय टी२० संघात पदार्पण केले होते. पदार्पणाच्या टी२० सामन्यातील त्याचे प्रदर्शनही कौतुकास्पद राहिले. मात्र दुखापतीमुळे तो सतत संघातून आत बाहेर होत राहिला. तसेच त्याच्या प्रदर्शनावरही याचा परिणाम दिसून आला. तो सध्या पूर्णपणे फिट आहे. तरीही निवडकर्ते त्याच्यावर दुर्लक्ष करताना दिसून आहेत. ४ टी२० सामन्यात ७ विकेट्सची कामगिरी करणारा नटराजन झिम्बाब्वे दौऱ्यावर निवडला जाण्याचा हक्कदार होता. मात्र त्याची निवड झालेली नाही.
नवदीप सैनी-
या यादीत तिसरे आणि शेवटचे नाव येते नवदीन सैनी याचे. सैनीने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी२० सामना खेळला होता. त्यानंतर निवडकर्ते सातत्याने त्याच्यावर दुर्लक्ष करत आहेत. आयपीएल गाजवल्यानंतर सैनी इंग्लंडमधील काउंटी चँपियनशीपमध्ये आपल्या धारदार गोलंदाजीची चमक दाखवत आहे. यानंतर तरी सैनीचे भारतीय संघात पुनरागमन होणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. सैनीने भारताकडून ११ टी२० सामने खेळताना १३ विकेट्स घेतल्या आहेत.
झिम्बाब्वे विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ-
शिखर धवन (कर्णधार), ऋतूराज गायकवाड, शुबमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिध कृष्णा, मोहम्मद सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या दिग्गजाने कोहलीबाबत केले विराट वक्तव्य! म्हणाला, ‘त्याला एशिया कपमध्ये…’
नाणेफेकीत पाकिस्तानची बाजी, २ बदलांसह मैदानात उतरला भारतीय संघ; पाहा प्लेइंग इलेव्हन
‘कोहलीमुळेच भारत टी२० विश्वचषक जिंकू शकत नाही’, पाकिस्तानी दिग्गजाने सोडले टीकास्त्र