इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेला ९ एप्रिल पासून प्रारंभ झाला होता.तसेच या स्पर्धेचा अंतिम सामना ३० मे रोजी होणार होता. परंतु कडक बायो बबल असताना देखील, आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे समीकरण देखील बदलताना दिसून येत आहे. आता सर्वत्र आयपीएल नव्हे तर विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ जून पासून ते २२ जून पर्यंत साऊथॅम्पटन मध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात बलाढ्य भारत आणि न्यूझीलंड संघ आमने सामने असणार आहे. भारतीय संघ, आयपीएल २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात युकेला रवाना होणार होते. परंतु आता आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आल्यामुळे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, भारतीय संघ मेच्या शेवटच्या आठवड्यात युकेला रवाना होऊ शकतो.यासोबतच न्यूझीलंड संघातील काही खेळाडू भारतीय संघासोबत प्रवास करू शकतात.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसी युके सरकारसोबत भारतीय खेळाडूंच्या प्रवासाबद्दल बातचीत करणार आहे. भारतात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, युकेने ही भारताला रेड लिस्ट मध्ये टाकून प्रवास करण्यावर निर्बंध लागू केले आहेत. तसेच इंग्लंड मध्ये जाणाऱ्या खेळाडूंना देखील विलागिकरणात राहावे लागणार आहे. लवकरच बीसीसीआय विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी खेळाडू, सहकारी स्टाफ आणि अधिकाऱ्यांची घोषणा करू शकतात. भारतीय संघ इंग्लंड संघाविरुद्ध ४ ऑगस्ट पासून ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
दोन्ही देशांचे बोर्ड इंग्लंड सरकारशी विलग्नवासाच्या नियमांच्या संदर्भात बोलणी करू शकतात. भारत आणि इंग्लंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ पहिल्यांदा आमने सामने येणार आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ उत्साहित आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची चर्चा रंगायला सुरुवात झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अंबानींच्या संघाची तऱ्हाच निराळी! परदेशी खेळाडूंना घरी पोहचवण्यासाठी केली खाजगी विमानाची व्यवस्था
हे ३ युवा खेळाडू यंदाच्या आयपीएलमुळे रातोरात आले प्रसिद्धीझोतात
सिराजच्या भेदक यॉर्कर्सने माजी क्रिकेटपटू झाला प्रभावित, प्रशंसा करत म्हणाला