न्यूझीलंड विरुद्ध भारत (New Zealand vs India) संघात 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटच्या कसोटी सामन्याला 29 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात भारतीय फलंदाजांनी खराब फटकेबाजी केल्यामुळे आमचा उद्देश पूर्ण झाला, असे न्यूझीलंडचा मध्यमगती वेगवान गोलंदाज काईल जेमीसनला (Kyle Jamieson) वाटते.
न्यूझीलंडच्या 6 फूट 8 इंच उंची असलेल्या जेमीसनने आपल्या पदार्पणाच्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात पहिल्या डावात 5 विकेट्स घेण्याची उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तसेच पहिल्या दिवशी तिसऱ्या डावात जेमीसनने केलेल्या गोलंदाजीच्या मदतीने भारतीय संघाचा पहिला डाव 242 धावांवर संपुष्टात आला.
पहिल्या दिवसाच्या खेळानंतर जेमीसन म्हणाला की, “भारतीय संघाच्या खेळाडूंनी जेवढी फटकेबाजी वेलिंग्टन (Wellington) येथे केली होती, त्यापेक्षा अधिक फटकेबाजी या डावात केली. मला असे वाटते की, कदाचित खेळपट्टीनेही त्यांना असे करण्यास मदत केली असावी. परंतु मला वाटते की, याच कारणांमुळे आम्हांला त्यांना बाद करण्यात मदत मिळाली.”
हेगली ओव्हलची (Hagley Oval) खेळपट्टी जोरदार फटकेबाजी करण्यास चांगली आहे. त्यामुळे गोलंदाजांना योग्य लेंथ मिळवायला थोडा वेळ लागला.
“मला असे वाटते की, तुम्हाला चेंडू ज्या ठिकाणी पोहोचवायचा प्रयत्न करत आहात जर तो योग्य ठिकाणी पडला तर चागंले आहे. परंतु जर त्यात थोडेही अंतर राहिले तर ते फलंदाजासाठी घातक ठरू शकते. परंतु फलंदाजांनी काही प्रमाणात चांगली फटकेबाजी केली होती,” असे भारतीय फंलदाजांबद्दल बोलताना जेमीसन म्हणाला.
जेमीसनने या सामन्याच्या पहिल्या डावात पृथ्वी शॉ (54), चेतेश्वर पुजारा (54), रिषभ पंत (12), रविंद्र जडेजा (09) आणि उमेश यादव (0) या खेळाडूंना बाद केले होते.
जेमीसनला असे वाटते की, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली असेल.
“खेळपट्टी दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही अशीच असेल. जिथे तुमची फटकेबाजी महत्त्वाची असेल. त्यानंतर खेळपट्टी सपाट राहील,” असेही खेळपट्टीबद्दल बोलताना जेमीसन म्हणाला.
केन विलियम्सनला बाद केल्यानंतर विराट कोहलीने केले 'असे' सेलिब्रेशन, पहा व्हिडिओ
वाचा????https://t.co/fdpK4xKs95????#म #मराठी #cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020
इंग्लंडचा हा गोलंदाज म्हणतोय, 'आयपीएलमध्ये माझ्या गोलंदाजीच्या आयडीया सांगणार नाही'
वाचा- ????https://t.co/s86KZ3anfO????#म #मराठी #Cricket #TeamIndia #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) March 1, 2020