---Advertisement---

INDvsENG 1st Test : विराट, गिल यांची अर्धशतके व्यर्थ, पहिल्या कसोटीत भारत पराभूत; इंग्लंडचा २२७ धावांनी दणदणीत विजय

---Advertisement---

चेन्नई। भारत विरुद्ध इंग्लंड संघात एमए चिदंबरम स्टेडियम (चेपॉक स्टेडियम) येथे पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने २२७ धावांनी विजय मिळवला आहे. याबरोबरच ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडने भारताला या सामन्यात ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला ५८.१ षटकात सर्वबाद १९२ धावाच करता आल्या.

या डावात भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७२ धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ शुबमन गिलने ५० धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पाही पार करता आला नाही. इंग्लंडकडून या डावात जॅक लीचने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर जेम्स अँडरसनने ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय डॉमनिक बेस  बेन स्टोक्सने आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी १ विकेट घेतली.

शेवटच्या झटपट विकेट्स 

भारताकडून पाचव्या दिवसाच्या दुसऱ्या सत्राची सुरुवात भारताचा कर्णधार विराट कोहली आणि आर अश्विनने चांगली केली होती. विराटने त्याचे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र, या दोघांनी अर्धशतकी भागीदारी झाली असताना लगेचच अश्विन डावाच्या ५२ व्या षटकात ९ धावांवर बाद झाला. तर पुढे बेन स्टोक्सने ५५ व्या षटकात विराट कोहलीला ७२ धावांवर त्रिफळाचीत केले. त्या पुढच्याच षटकात शहाबाद नदीम जॅक लीचच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला. अखेर जसप्रीत बुमराहला जोफ्रा आर्चरने शुन्यावर बाद करत भारताचा डाव १९२ धावांवर संपवला.

विराट कोहलीचे अर्धशतक पूर्ण

विराटने एका बाजूने विकेट्स सातत्याने गेल्यानंतरही एक बाजू लावून धरली आणि दिवसातील दुसऱ्या सत्राची सुरुवात आर अश्विनसह चांगली केली आहे. अश्विननेही विराटला चांगली साथ दिली आहे. विराटने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच डावाच्या ४५ व्या षटकात ७४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटीमधील २४ वे अर्धशतक आहे. याबरोबरच भारताच्याही १५० धावा पूर्ण झाल्या.

भारताच्या दुसऱ्या डावात ५० षटकांत ६ बाद १६५ धावा झाल्या आहेत. भारताकडून विराट कोहली ८९ चेंडूत ५८ धावांवर आणि आर अश्विन ४४ चेंडूत ९ धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी २५५ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.

भारताच्या दुसऱ्या डावात पहिल्या सत्राखेर ३९ षटकात ६ बाद १४४ धावा 

भारताने १२० धावांच्या आतच ६ विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहलीने आर अश्विनला साथीला घेत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पहिल्या सत्राखेरपर्यंत आणखी विकेट जाऊ दिली नाही. विराटने एका बाजून नियमित कालांतराने विकेट्स जात असताना एक बाजू भक्कमपणे सांभाळली आहे. दरम्यान, अश्विनच्या बोटाला एक चेंडू लागला. मात्र, त्यानंतर त्याने फलंदाजी करणे चालू ठेवले.

पहिल्या सत्राखेर भारताने दुसऱ्या डावात ३९ षटकात ६ बाद १४४ धावा केल्या आहेत. सध्या भारताकडून विराट कोहली ५१ चेंडूत ४५ धावांवर आणि आर अश्विन १६ चेंडूत २ धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी २७६ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.

पंत पाठोपाठ सुंदरही बाद

अँडरससने शुबमन गिल आणि अजिंक्य रहाणेला एकाच षटकात बाद केल्यानंतर रिषभ पंत कर्णधार विराट कोहलीला साथ देईल असे वाटत होते. त्या दोघांनी भागीदारीची सुरुवातही चांगली केली होती. मात्र, जेम्स अँडरसनने ही जोडी फार काही टिकणार नाही याकडे लक्ष दिले. त्याने ३३ व्या षटकात पंतला बाद केले. पंत १९ चेंडूत ११ धावा करुन शॉर्ट कव्हरला उभ्या असलेल्या जो रुटकडे झेल देऊन बाद झाला.

त्यानंतर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरला डॉमनिक बेसने यष्टीरक्षक जोस बटलरकडे झेल देण्यास भाग पाडले. सुरुवातील पंचांनी त्याला बाद दिले नव्हते. मात्र, इंग्लंडने रिव्ह्यू घेतला आणि त्यात चेंडू सुंदरच्या बॅटला लागला असल्याचे दिसले. दरम्यान, ही चेंडू बॅटला लागला असल्याचे आधीच समजल्याने रिव्ह्यू संपेपर्यंत वॉशिंग्टनने मैदानाबाहेर जाण्यासाठी चालायला सुरुवात केली होती. तो शुन्यावर बाद झाला.

भारताने दुसऱ्या डावात ३५ षटकात ६ बाद ११८ धावा केल्या आहेत. भारताकडून विराट कोहली ४१ चेंडूत २५ धावांवर आणि आर अश्विन २ चेंडूत ० धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी ३०२ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ४ विकेट्सची गरज आहे.

अँडरसनचा कहर, अर्धशतकवीर गिल पाठोपाठ रहाणेला केलं शुन्यावर बाद

पुजारा बाद झाल्यानंतरही शुबमनने आक्रमक खेळ कायम ठेवला होता. त्याने आक्रमक खेळतच त्याचे अर्धशतक २६ व्या षटकात ८१ चेंडूत पूर्ण केले. मात्र, लगेचच पुढच्याच षटकात जेम्स अँडरसनने शुबमनला त्रिफळाचीत करत भारताला तिसरा धक्का दिला. शुबमनने ७ चौकार आणि १ षटकारासह ८३ चेंडूत ५० धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे फलंदाजीसाठी आला. मात्र तो फार काल टिकू शकला नाही. त्यालाही २७ व्या षटकात अँडरसनने शुन्यावर बाद केले.

भारताने दुसऱ्या डावात २७ षटकात ४ बाद ९२ धावा केल्या आहेत. भारताकडून विराट कोहली १८ चेंडूत १० धावांवर आणि रिषभ पंत १ चेंडूत ० धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी ३२८ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ६ विकेट्सची गरज आहे.

https://www.instagram.com/p/CLCe_cZrfb9/

पाचव्या दिवसाच्या सुरुवातीला पुजाराची विकेट

त्यांनी पाचवा दिवस सुरु झाल्यानंतरची पहिली ५ षटके चांगली खेळली होती. मात्र, डावाच्या २० व्या जॅक लीचने पुजाराला बाद केले. पुजारा स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या बेन स्टोक्सकडे झेल देऊन बाद झाला. पुजाराने ३८ चेंडूत १ चौकारासह १५ धावा केल्या. पुजारा बाद झाल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी आला आहे.

भारताने दुसऱ्या डावात २३ षटकात २ बाद ७८ धावा केल्या आहेत. भारताकडून शुबमन गिल ७० चेंडूत ४२ धावांवर खेळत आहे. तर विराट कोहली ११ चेंडूत ४ धावांवर खेळत आहे. अद्याप भारताला विजयासाठी ३४२ धावांची गरज आहे. तर इंग्लंडला ८ विकेट्सची गरज आहे.

पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात –

या सामन्यात इंग्लंडने भारतासमोर तब्बल ४२० धावांचे भलेमोठे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसाखेर १ विकेट गमावून ३९ धावा केल्या असल्याने मंगळवारी त्यांच्यासमोर उर्वरित ३८१ धावा करण्याचं आव्हान असणार आहे. तर इंग्लंडला विजयासाठी पाचव्या दिवशी ९ विकेट्सची गरज आहे.

पाचव्या दिवशी भारताने दुसऱ्या डावातील १३ व्या षटकापासून आणि १ बाद ३९ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे. भारताकडून चौथ्या दिवशी नाबाद असलेली शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराची जोडी फलंदाजीसाठी मैदानात उतरली आहे. गिलने ३५ चेंडूत १५ धावांपासून आणि चेतेश्वर पुजाराने २३ चेंडूत १२ धावांपासून पुढे खेळायला सुरुवात केली आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---