---Advertisement---

१४ दिवस परदेशी खेळाडूंना वेगळे ठेवा; पण त्यांना आयपीएलसाठी भारतात येऊ द्या

---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे जगभराता हाहाकार उडालेला असताना आयपीएलमधील काही संघ मालकांना परदेशी खेळाडूंनी आयपीएल खेळावे असे वाटते. यासाठी परदेशी खेळाडूंना 14 दिवस इतरांपासून वेगळे ठेवण्याची तयारीही काही संघमालकांनी दाखविल्याचे बोलले जात आहे.

भारत सरकारने 31 मार्च पर्यंत युएई, कतार, ओमान व कुवेतमधून येणाऱ्या प्रवाशांना दोन आठवडे निरीक्षणांखाली ठेवण्याचा अध्यादेश काढला आहे. तसेच काही देशांतील प्रवाशांना 31 मार्च पर्यंत भारतात येण्यासही बंदी घालण्यात आली आहे.

एका फ्रंचाईजीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की, ते परदेशी खेळाडूंना भारतात खेळविण्यासाठी तयार आहेत. तसेच त्यांना 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवले तरीही संघमालकांची त्याला हरकत नाही. जर आम्हाला सरकारने मान्यता दिली व व्हीजाचे सर्व सोपस्कर पार पडले तर हे होऊ शकते. परदेशी खेळाडूंना 1 एप्रिलपर्यंत भारतात आणून पुढे 14 दिवस निरीक्षणाखाली ठेवता येऊ शकते. परंतु यासाठी परदेशी खेळाडूंना व्हिजा देणे खूप महत्त्वाचे आहे.

आयपीएल 15 एप्रिल 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. याबद्दल अजूनही कोणताही निर्णय न झाल्यामुळे मोठे संकच सध्या या जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीगसमोर उभे राहिले आहे.

ट्रेडिंग घडामोडी-

टी20 क्रिकेट विश्वचषकाच्या आयोजनाबद्दलची सर्वात मोठी बातमी

 जर आयपीएल रद्द झाली तर विराट-रोहितचे किती होणार नुकसान

 आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…

राजस्थान रॉयल्सला बसला मोठा धक्का; गोलंदाजाचा झाला भीषण अपघात

 आयपीएलचे आयोजन होणार एकाच शहरात?

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---