नवी दिल्ली। राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणारा स्टार फलंदाज संजू सॅमसनने आयपीएल २०२० मध्ये आतापर्यंत केवळ २ सामने खेळले आहेत. परंतु या २ सामन्यातही त्याने २१४.८६ च्या स्ट्राईक रेटने १५९ धावा कुटल्या आहेत. यादरम्यान त्याने २ अर्धशतके ठोकली आहेत. आपल्या धडाकेबाज खेळीने त्याने दिग्गज माजी खेळाडू गौतम गंभीर आणि काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांनाही आपला चाहता बनवले आहे.
मागील वर्षी त्याने १३ सामन्यात केवळ ३४२ धावा केल्या होत्या. परंतु केवळ एकाच वर्षात सॅमसनच्या फॉर्ममध्ये एवढा शानदार बदल झाला तरी कसा, असा प्रश्न सर्वांना पडला असेल. याचे कारण आहे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली. विराटने दिलेल्या सल्ल्यामुळेच सॅमसनने स्वत: मध्ये बदल केले आहेत.
विराटने दिला होता फीटनेस मंत्र
सॅमसनने सामन्यापूर्वी माध्यमांशी बोलताना सांगितले की, तो सुरुवातीला आपल्या फीटनेसवर लक्ष देत नव्हता. मागील वर्षी त्याला भारतीय संघात विराटसह ड्रेसिंग रूम शेअर करण्याची संधी मिळाली होती. फीटनेसबाबत विराटची आवड पाहून सॅमसन भलताच आश्चर्यचकित झाला होता. तेव्हा सॅमसनने विराटला विचारले होते की, नेमकं तो फीटनेस आणि डाएट एवढ्या कठोरपणे कसं काय फॉलो करतो. यावर प्रत्युत्तर देताना विराटने विचारले होते की, “संजू तुला पुढील किती वर्षे क्रिकेट खेळायचे आहे?” यावर सॅमसनने उत्तर देत म्हटले होते की, जवळपास त्याला १० वर्षे क्रिकेट खेळायचे आहे.
यानंतर विराटने त्याला समजावून सांगताना म्हटले होते की, “१० वर्षांनंतर तू तुला हवं ते खाऊ शकतो. कुठेही खाऊ शकतो. हे १० वर्षे तुझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुझे सर्वोत्तम क्रिकेटमध्ये दे, तेव्हाच तुला यशाला गवसणी घालता येईल. त्यानंतर तू आयुष्यात जे पाहिजे ते करू शकतो.”
विराटच्या या सल्ल्यानंतर सॅमसनने आपल्या फीटनेसवर लक्ष द्यायला सुरुवात केली. कोरोना व्हायरसदरम्यान मिळालेल्या वेळा त्याने या पैलूंवर खूप मेहनत घेतली. “मी आपल्या फीटनेस, डाएट आणि ट्रेनिंगवर खूप मेहनत केली. याव्यतिरिक्त ताकतीवरही खूप काम केले. कारण माझ्या खेळात याची महत्त्वाची भूमिका आहे,” असे आपल्या फीटनेसबद्दल बोलताना सॅमसन म्हणाला.
एमएस धोनीसारखे नाही बनायचे
सॅमसनची तडाखेबंद खेळी पाहून अनेक चाहत्यांनी आणि दिग्गज खेळाडूंनी त्याची तुलना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीसोबत केली. यावर बोलताना सॅमसनने म्हटले की, त्याला धोनीसारखे बनायचे नाही. तो म्हणाला, “मी धोनीसारखा खेळू शकत नाही. त्यांच्यासारखा बनण्याचा कोणी प्रयत्नही नाही केला पाहिजे. तो महान आहे आणि कोणीही त्याच्यासारखा बून शकत नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
पंजाबविरुद्च्या विजयाचा नायक ठरलेला तेवतिया म्हणतो, ‘या’ भारतीय गोलंदाजांनी मला खूप मदत केली
तेवतियाची कमाल! ५ षटकार ठोकल्यानंतर घरच्यांच्या डोक्याला ताप, तब्बल…
ट्रेंडिंग लेख-
चेन्नई-पंजाबला अस्मान दाखवणाऱ्या दिल्लीला हैदराबादने लोळवलं, ‘हे’ ५ खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार
चिन्नप्पापट्टी ते युएई असा प्रवास करणारा ‘टी नटराजन’
कधी खेळली गेली होती पहिली सुपर ओव्हर? घ्या जाणून