---Advertisement---

१० कोटी खर्च केलेल्या ‘या’ अष्टपैलू खेळाडूवर असणार आरसीबी संघाची मदार

On: गुरूवार, सप्टेंबर 17, 2020 5:28 PM
---Advertisement---

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) सर्वोत्कृष्ट कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे संघ ख्रिस मॉरिस आणि ऍरॉन फिंचला संघात घेऊन समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

परंतु आता मैदानावरच कळेल की हे प्रयत्न किती प्रभावी ठरतील. विराटचा सध्याचा संघ २०१६ नंतरचा सर्वात संतुलित संघ मानला जातोय. आतापर्यंत त्यांनी तीन वेळा अंतिम फेरी गाठली होती. परंतु त्यांना तिन्हीवेळा पराभव पत्करावा लागला.

आरसीबीने दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिसवर १० कोटी रुपये खर्च केले आहेत. व्यवस्थापनाला अंतिम षटकामध्ये कसून गोलंदाजी व्यतिरिक्त खालच्या फळीत आक्रमक फलंदाजी करणे त्याच्याकडून अपेक्षित आहे.

२०१७ मध्ये ख्रिस गेल गेल्यापासून आरसीबीची फलंदाजी विराट आणि एबी डिविलियर्सवर अवलंबून आहे. परंतु ऑस्ट्रेलियाचा मर्यादित षटकांचा कर्णधार ऍरॉन फिंचच्या आगमनाने त्यांंच्यावरील दबाव कमी होईल.

विराट आता फिंचसह डावाची सुरुवात करू शकतो किंवा तिसऱ्या क्रमांकावर खेळू शकतो. पण जर विराट तिसऱ्या क्रमांकावर खेळला, तर पार्थिव पटेल किंवा देवदत्त पड्डिकल, फिंचबरोबर डावाची सुरूवात करेल.

पण जर स्टार खेळाडू चालले नाहीत, तर गुरकीरतसिंग मान आणि शिवम दुबे या युवा खेळाडूंवर जबाबदारी असेल, तर खालच्या क्रमांकावर मॉरिस बरोबर मोईन अली देखील संघात आहे.

अली किंवा लेगस्पिनर ऍ़डम झम्पा यांपैकी एकाची निवड केली जाईल. त्याचबरोबर युझवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर हे देखील दोन फिरकीपटू आहेत, तर वेगवान गोलंदाजांमध्ये मॉरिस, डेल स्टेन, नवदीप सैनी, उमेश यादव आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे. माईक हेसन आणि सायमन कॅटिच यांच्यासह संघाचा प्रशिक्षक स्टाफही नवीन आहे. आरसीबी चाहते यावेळी प्रार्थना करतील की त्यांची १३ वर्षाची प्रतिक्षा यावेळी संपेल.

आयपीएलच्या १३ व्या हंगामाला येत्या १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे, तर आरसीबी संघ २१ सप्टेंबर रोजी आपला पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळणार आहे.

आरसीबीचा आयपीएल २०२० संघ-

विराट कोहली (कर्णधार), ऍरॉन फिंच, देवदत्त पड्डिकल, पार्थिव पटेल, एबी डिविलियर्स, गुरकीरतसिंह मान, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अ‍ॅडम झम्पा, इसुरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.

महत्त्वाच्या बातम्या-

-माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’

-एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

-धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

ट्रेंडिंग लेख-

-वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

-आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---