fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

वनडेमध्ये जलद १०० षटकार मारणारे ८ खेळाडू; या भारतीय दिग्गजाचाही आहे समावेश

September 17, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


मँचेस्टर। बुधवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवत ३ सामन्यांची वनडे मालिकाही २-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात ग्लेन मॅक्सवेल आणि ऍलेक्स कॅरेचा महत्त्वाचा वाटा होता. या दोघांनीही शतकी खेळी करताना द्विशतकी भागीदारीही रचली.

१०० धावांच्या आत ५ विकेट्स गमावलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला मॅक्सवेल आणि कॅरेने सांभाळले. मॅक्सवेलने ९० चेंडूत ४ चौकार आणि ७ षटकारांसह १०८ धावांची खेळी केली. तर कॅरेने ११४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह १०६ धावा केल्या. त्यांच्या या शतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने ३०३ धावांचे आव्हान ४९.४ षटकात सहज पार केले. या शतकी खेळीवेळी मॅक्सवेलने खास विक्रमही केला आहे.

मॅक्सवेलने या शतकी खेळीदरम्यान कारकिर्दीत १०० वनडे षटकार पुर्ण केले आहेत. त्याचे आता १०३ वनडे डावात १०५ षटकार झाले आहेत. याबरोबरच तो वनडेमध्ये सर्वात जलद १०० षटकार पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर वेस्ट इंडिजचा कायरन पोलार्ड असून त्याने ८६ वनडे डावात कारकिर्दीतील १०० षटकार पूर्ण केले होते. १०० पेक्षा कमी वनडे डाव खेळत १०० षटकार पूर्ण करणारा सध्या तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

या यादीत भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी ७ व्या क्रमांकावर आहे. त्याने १२३ वनडे डावात १०० षटकार पूर्ण केले होते.

वनडेमध्ये सर्वात जलद १०० षटकार पूर्ण करणारे क्रिकेटपटू (डावांनुसार)

८६ डाव – कायरन पोलार्ड

१०३ डाव – ग्लेन मॅक्सवेल

१०४ डाव – जोस बटलर

१०९ डाव – ऍरॉन फिंच

११६ डाव – रॉस टेलर

१२० डाव – मार्टिन गप्टिल

१२३ डाव – एमएस धोनी

१२६ डाव – शाहिद आफ्रिदी

महत्त्वाच्या बातम्या – 

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

धोनीचा सीएसके संघाला मोठा झटका; हा खेळाडू पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता

…म्हणून केकेआर संघातील ‘हा’ खेळाडू आंद्रे रसेलशी जास्त बोलत नाही, घ्या कारण जाणून

ट्रेंडिंग लेख –

चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

सर्व चौकटी मोडून जगात क्रिकेट समालोचनाचा आदर्श घालून देणारी नेरोली मिडोज


Previous Post

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

Next Post

माजी दिग्गज म्हणतो, ‘संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर ‘हे’ काम करा’

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/IPL
क्रिकेट

जर आरसीबीने ‘ही’ गोष्ट केली असती, तर आज कोहली नव्हे धोनी असता संघाचा कर्णधार

January 25, 2021
Next Post

माजी दिग्गज म्हणतो, 'संघांना मांकडिंगपासून रोखायचे असेल, तर 'हे' काम करा'

Photo Courtesy: Twitter/IPL

प्रत्येक आयपीएल संघातील एक असा खेळाडू, ज्याची कामगिरी ठरवेल त्याच्या संघाचे भविष्य

Photo Courtesy: Twitter/ BCCI

क्रिकेटच्या लोकप्रिय होस्टसोबत दिसणार टीम इंडियाचा 'हा' माजी खेळाडू...

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.