fbpx
Sunday, February 28, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएल २०२० मध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी हे ३ खेळाडू ठरणार विजयाचे शिल्पकार?

September 17, 2020
in टॉप बातम्या, IPL, क्रिकेट
0

कोरोना व्हायरसमुळे अनिश्चित काळासाठी स्थगित झालेली आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबरपासून ते १० नोव्हेंबरपर्यंत युएई येथे खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील शाहरुख खान यांच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाने आत्तापर्यंत २०१२ आणि २०१४ ला आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तसेच त्यांनी २०१६, २०१७ आणि २०१८ असे सलग तीन वर्षे प्लेऑफमध्येही स्थान मिळवले होते.

आता केकेआर यावर्षी तिसरे विजेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. केकेआर संघाचा पहिला सामना २३ सप्टेबरला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध आबु धाबी येथे होणार आहे. यंदा हा एक तुल्यबळ संघ असून या संघात दिग्गज खेळाडू आहेत. या लेखात अशा ३ खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत, जे केकेआर संघाला तिसरे विजेतेपद मिळवून देण्यात महत्वाची भूमिका निभावू शकतात.

आंद्रे रसल (Andre Russell)

आयपीएलमधील गेल्या काही वर्षातील आंद्रे रसेलच्या कामगिरीवर नजर टाकल्यास तो संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला आहे. मागील वर्षीही स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली होती. त्याने ५६.६६ च्या सरासरीने ५१० धावा केल्या होत्या. या काळात त्याचा स्ट्राईक रेट २०४.८१ होता. त्याने ४ अर्धशतके केली होती. यावर्षी त्याला वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्यास मिळू शकते. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत ६४ सामन्यात १४०० धावा केल्यात तर ५५ बळी देखील मिळवले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा विस्फोटक फलंदाज आंद्रे रसल हा सध्या फॉर्ममध्ये आहे. आयपीएलच्या १२ व्या हंगामात त्याने केवळ १४ सामन्यात ५२ षटकार मारले होते. यासह तो पूर्ण हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानावर विराजमान होता. त्याची अशी कामगिरी पाहता तो यंदाचा आयपीएल चषक केकेआर संघाला मिळवून देऊ शकतो.

शुबमन गिल (Shubman Gill)

२०१८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषकात धमाल कामगिरी करत प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या सलामीवीर शुबमन गिलला, आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने आपल्या संघात सामील केले. केकेआरसाठी त्याने काही महत्त्वपूर्ण खेळी देखील केल्या आहेत. २०१८ मध्ये केकेआरकडून शुबमनने १३ सामन्यांत २०३ धावा केल्या.

मागील वर्षी त्याने १४ सामन्यांत २९६ धावा केल्या होत्या. तसेच मागील वर्षी गिलने केकेआरकडून खालच्या फळीत फलंदाजी केली होती, त्यामुळे संघावर खूप टीका करण्यात आली होती. परंतु यंदा तो वरच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल.

आयपीएलमध्ये त्याने एकूण २७ सामन्यात ४९९ धावा केल्यात. त्यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याच्याकडे फलंदाजीत अफाट क्षमता आहे. त्याला संधी मिळाली तर तो संघासाठी उपयुक्त ठरू शकतो.

पॅट कमिन्स (Pat Cummins)

येत्या हंगामात कमिन्स केकेआरसाठी मुख्य भूमिका निभावेल. त्याला १५.५ कोटी खर्च करून केकेआरच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आले आहे. लिलावात तो सर्वात महाग विकला गेलेला परदेशी खेळाडू ठरला होता.

पॅट कमिन्सने आतापर्यंत १६ आयपीएलम सामने खेळले असून त्यात त्याने १७ बळी मिळवले आहेत. कमिन्सने २०१४ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या वतीने आयपीएलमध्ये पदार्पण केले. यानंतर २०१७ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळाला. तर २०१८ मध्ये मुंबई इंडियन्स संघात आला आणि आता पुन्हा एकदा केकेआर संघात तो दाखल झाला आहे. इतक्या वर्षात त्याचा अनुभव पाहता यंदाच्या आयपीएलमध्ये तो जबरदस्त कामगिरी करून संघाला विजयी करू शकतो.

आयपीएल २०२० मधील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या सामन्यांचे वेळापत्रक-

२३ सप्टेंबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स,

२६ सप्टेंबर २०२०
विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद

३० सप्टेंबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स

३ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटलस

७ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

१० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

१२ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

१६ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध मुंबई इंडियन्स

१८ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद

२१ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर

२४ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध दिल्ली कॅपिटलस

२६ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

२९ ऑक्टोबर २०२०
विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

३० ऑक्टोबर २०२०
विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब

१ नोव्हेंबर २०२०
विरुद्ध राजस्थान रॉयल्स

कोलकाता नाईट रायडर्सचा संघ-

दिनेश कार्तिक ( कर्णधार), रिंकू सिंग, सिद्धेश लाड, प्रसिद्ध कृष्णा, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, हॅरी गार्नी, संदीप वारियर, नितीश राणा, लॉकी फर्ग्युसन, शुबमन गिल, कुलदीप यादव, सुनील नरेन, आंद्रे रसेल, निखिल नाईक, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, एम. सिद्धार्थ, वरुण चक्रवर्ती, राहुल त्रिपाठी, पॅट कमिन्स, इयन मॉर्गन.


Previous Post

चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी

Next Post

४२६० वनडे सामन्यात न घडलेली गोष्ट काल घडली, इतिहास लिहीला गेला सुवर्णांक्षरांनी

Related Posts

Photo Courtesy: Twitter/MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१: एटीके मोहन बागानला गारद करीत मुंबई सिटीच अव्वल

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१: हैदराबादविरुद्ध गोलशून्य बरोबरीसह गोवा बाद फेरीत दाखल

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCIDomestic
क्रिकेट

आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट! ‘या’ खेळाडूने ठोकलंय सलग तिसरं शतक, ५ सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
इंग्लंडचा भारत दौरा

विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट

February 28, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारताविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा, ‘या’ खेळाडूकडे कर्णधारपद

February 28, 2021
Photo Courtesy:
Twitter/@BCCI
इंग्लंडचा भारत दौरा

‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा

February 28, 2021
Next Post

४२६० वनडे सामन्यात न घडलेली गोष्ट काल घडली, इतिहास लिहीला गेला सुवर्णांक्षरांनी

आफ्रिदी, सेहवाग, एबीचे विक्रम मॅक्सवेलने एका झटक्यात मोडले

मॅक्सवेलने धुतले इंग्लंडला, टेन्शन आले आयपीएलमधील इतर संघांना

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.