किंग्ज इलेव्हन पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने म्हटले आहे की युएईमध्ये वेगवान गोलंदाजांना त्यांच्या गोलंदाजीचे काम व्यवस्थित हाताळावे लागणार आहे. कारण युएईमध्ये गोलंदाजांसाठी कोणत्याही परिस्थितीत कोणतीही गोष्ट सोपी असणार नाही. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाची आयपीएल युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
युएईमधील दुबई, अबूधाबी आणि शारजाह या तीन शहरांमध्ये आयपीएल लीगचे सामने खेळवण्यात येणार आहेत. शमी मंगळवारी दुबईत बोलताना म्हणाला की, “इकडे तापमान भारतापेक्षा बरेच जास्त आहे. खेळाडूंना डिहायड्रेशन होण्याची शक्यता आहे. थकवा येण्याची शक्यता देखील आहे. म्हणूनच आपल्याला अशा गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत.
शमी म्हणाला, “हे खूप कठीण जाईल कारण इथली विकेटही खूप वेगळी आहे. म्हणून वर्कलोड व्यवस्थापन खूप महत्वाचे आहे. परंतु ते हाताळले जाऊ शकत नाही, इतकेही अवघडही नाही.”
“आपण गोष्टी कशा हाताळतो हे आपल्यावर अवलंबून आहे. दुबईला येणे छान आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आम्ही आम्हाला आवडत असलेला खेळ खेळत आहोत. म्हणून या भावनेची तुलना केली जाऊ शकत नाही. सर्वात चांगली गोष्ट अशी आहे की प्रत्येकजण मैदानात सराव करत आहेत. भारतातील लोकांच्या चेहऱ्यावर आयपीएलने हास्य आणले पाहिजे,” असंहो तो बोलताना म्हणाला.
भारतीय वेगवान गोलंदाज शमी आयपीएलमध्ये पंजाबच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. त्याच्यावर आणखी काही दबाव आहे का? असे विचारले असता तो म्हणाला की, मी संघात वरिष्ठ गोलंदाज असण्याचा दबाव घेत नाही. तुम्ही तुमच्या प्रतिभेवर आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे.
शमी पुढे म्हणाला, “मी कोणत्याही प्रकारचे लक्ष्य करण्यात विश्वास ठेवत नाही. मला आवश्यकतेनुसार व परिस्थितीनुसार चांगले काम करण्याचा विश्वास आहे. माझे कायम हेच प्रयत्न असतात की मी जे करत आहे. ते अजून चांगलं कसं करता येईल याचा प्रयत्न करत असतो.”
या वर्षाच्या अखेरीस भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौरा करणार आहे. जेथे ४ सामन्यांची कसोटी मालिका आणि टी२० मालिका खेळणार आहे.
भारताने शेवटची ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला होता. पण यावेळी भारतासाठी खूप मोठे आव्हान असणार आहे. कारण यावेळी ऑस्ट्रेलिया संघात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर असतील.
अगोदरच्या मालिकेत या दोघांवरही बॉल टॅम्परिंगसाठी बंदी घालण्यात आली होती. पण शमी म्हणाला, “यापूर्वी आम्ही त्यांना हरवले आहे. आपण असे म्हणू शकत नाही की ते दोघं त्यावेळी नव्हते, म्हणून हे सोपे होते. आम्ही असा विचार करू शकतो की जर आमच्याकडे चांगला गोलंदाज असेल तर ते आमच्यासाठी चांगले आहे. आपल्याला परिस्थिती आणि सद्य फॉर्म संबंधित योजना आखणे आवश्यक असते. जर आपण दोन्ही संघांची तुलना केली तर ते मजबूत आहेत. आपण आपल्या योजना कशा अंमलात आणता यावर अवलंबून आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
यंदा ‘ही’ धावसंख्या आयपीएलमध्ये ठरणार आव्हानात्मक; या दिग्गजाचा दावा
इंग्लंडला मिळाला १० वा टी२० कर्णधार, मॉर्गन ऐवजी या खेळाडूने केले नेतृत्व
…म्हणूनच चेतेश्वर पुजाराला आयपीएल लिलावात खरेदीदार न मिळण्याचे दु:ख नाही
ट्रेंडिंग लेख –
३ अष्टपैलू खेळाडू जे आयपीएल २०२० मध्ये स्वतःला ‘फिनिशर’ म्हणून करु शकतात सिद्ध
आयपीएल संघांची चिंता वाढली; टी२० मालिकेत ऑस्ट्रेलिया-इंग्लंडचे हे ५ खेळाडू झाले फ्लॉप
रैना आणि हरभजनच्या अनुपस्थितही चेन्नई सुपर किंग्ज जिंकू शकेल आयपीएल; ही आहेत ३ कारणे