भारतीय संघाचा दिग्गज अष्टपैलू आणि नुकतेच चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधारपद सोडलेला रवींद्र जडेजा सध्या खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२२ मध्ये जडेजा अपयशी ठरताना दिसत आहे, पण सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंगच्या मते त्याचा फॉर्म ही चिंतेची बाब नाहीये.
रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने आयपीएलच्या चालू हंगामात आतापर्यंत खेळलेल्या १० सामन्यात फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागांमध्ये निराशाजनक प्रदर्शन केले आहे. यादरम्यान त्याने १९.३३ च्या स्ट्राइक रेटने ११६ धावा केल्या आहेत, तर ७.५२ च्या इकोनॉमीने धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या आहेत. बुधवारी (४ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्धच्या सामन्यात जडेजा अवघ्या ३ धावा करून बाद झाला. खेळाडूंच्या खराब प्रदर्शनामुळे सीएसकेला या सामन्यात १३ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर संघाचे प्रशिक्षक स्टीफन प्लेमिंग (Stephen Fleming) यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वर्चुअल पत्रकार परिषदेत बोलताना फ्लेमिंग जडेजाच्या फॉर्मविषयी म्हणाले की, “नाही मी चिंतीत नाहीये. टी-२० सामना अवघड असू शकतो आणि जेव्हा तुम्ही पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करत असता, तेव्हा तुम्हाला लय पुन्हा मिळवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. आम्ही हे पाहू की, पुढे त्याच्यासाठी कोणता फलंदाजी क्रम योग्य राहील, पण मला त्याच्या फॉर्मविषयी चिंता नाहीये.”
फ्लेमिंगने हे मान्य केले की, त्यांचा संघ सर्व विभागांमध्ये चांगले प्रदर्शन करू शकला नाहीये. ते म्हणाले की, “कधी कधी आमचे क्षेत्ररक्षण आणि झेल सोडणे चिंतेचा विषय आहे. आम्ही जास्त सामने हे जवळच्या अंतराने गमावले, आम्ही विजयाच्या खूप जवळ होतो. आमच्याकडून हे सामने हिसकावून घेतले गेले किंवा आम्हाला लक्ष्यापर्यंत पोहोचता आले नाही. तिन्ही विभागांमध्ये आम्ही कमी पडलो. आमचे काही गोलंदाज उपस्थित नव्हते, हे तुम्हाला माहिती आहे, पण आम्ही कमी पडलो.”
दरम्यान, सीएसकेच्या चालू हंगामातील प्रदर्शनावर नजर टाकली, तर त्यांनी सुरुवातीच्या १० सामन्यांपैकी फक्त तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ गुणतालिकेत ९ व्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये जाण्याचा त्यांच्या अपेक्षा जवळपास संपल्या आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्याच्यात धावा करण्याची इच्छाही दिसत नाही’, महान क्रिकेटरने विराटच्या फलंदाजीवर उपस्थित केले प्रश्न
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना
सामनावीर पुरस्कार पटकावूनही हर्षल पटेल स्वत:शीच का नाहीये खुश? म्हणाला, ‘तुम्हाला भान असावे लागते’