आयपीएल २०२२ हंगामातील १४ व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ आमने-सामने होते. या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील केकेआरने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्साला ५ विकेट्स राखून पराभवाची धूळ चारली. पण या सामन्यानंतर केकेआरचा फलंदाज नितीश राणा आणि मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहवर आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.
केकेआरचा फलंदाज नितीश राणा याच्यावर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या या सामन्यात मोठी कारवाई केली गेली. सामन्यादरम्यान राणा आयपीएल आचारसंहितेच्या लेवल १ च्या गुन्ह्यात दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याला मिळणाऱ्या सामना शुल्काच्या १० टक्के रक्कम दंडाच्या रूपात आकरली गेली आहे.
नितीश राणा (Nitish Rana) व्यतिरिक्त मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) याने देखील आयपीएलच्या आचार संहितेचे उल्लंघन केल्याचे पाहायला मिळाले. मुंबईचा अनुभवी गोलंदाज बुमराहला सामन्यात आचरसंहितेच्या उल्लंघनासाठी सध्या समज देऊन सोडले गेले आहे.
या दोघांनी सामन्यात नेमक्या कोणत्या नियमाचे उल्लंघन केले, याचा खुलासा केला गेला नाही. आयपीएलच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून याची पुष्टी केली गेली की, दोघांनी आयपीएल २०२२ च्या १४ व्या सामन्यात लेवल १ नुसार आचार संहितेतील नियमांच्या उल्लंघनामुळे शिक्षा सुनावली गेली आहे.
प्रसिद्धीपत्रकात सांगितले गेले आहे की, “मुंबई इंडियन्सच्या जसप्रीत बुमराहला पुण्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान इंडियन प्रीमियर लीगच्या आचार संहितेच्या उंल्लंघनासाठी सुनावण्यात आले आहे. बुमराहने आयपीएल आचार संहितेच्या लेवल १ चा अपराध स्वीकार केला आहे.” अधिकृत विधानात असेही सांगितले गेले आहे की, केकेआरचा फलंदाज राणाला त्याच्या अपराधासाठी सामना शुल्काच्या १० टक्के दंड लावला गेला आहे.
दरम्यान सामन्याचा विचार केला, तर मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ४ विकेट्सच्या नुकसानावर १६१ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सने हे लक्ष्य ५ विकेट्सच्या नुकसानावर आणि ४ षटके शिल्लक ठेऊन गाठले. मुंबई इंडियन्सचा हा चालू हंगामातील सगल तिसरा विजय होता. केकेआरच्या विजयात ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्सचे (१५ चेंडूत ५६ धावा) योगदान महत्वाचे ठरले.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022| सलग तीन पराभवांनंतर चेन्नई – मुंबईची प्लेऑफची समीकरणे आहेत तरी कशी?
IPL 2022 | कर्णधार रोहित शर्माच्या चेहऱ्याचा उडाला रंग, सलग तिसऱ्या पराभवानंतरची रिएक्शन व्हायरल
IPL2022| लखनऊ वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!