आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हणून ओळख असलेल्या मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२२ मध्ये अद्याप एकही विजय मिळालेला नाहीये. मुंबईला रविवारी (२४ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सकडून हंगामातील सलग आठवा पराभव मिळाला. यानंतर प्रशिक्षक माहेला जयवर्धनेने संघाच्या फलंदाजी क्रमाला मिळणाऱ्या सततच्या अपयशावर मोठी प्रतिक्रिया दिली. त्याने सलामीवीर इशान किशनच्या प्रदर्शनाबद्दल देखील चिंता व्यक्त केली.
लखनऊकडून मिळालेल्या पराभवानंतर प्रशिक्षक माहेला जयवर्धने (Mahela Jayawardene) बोलत होता. त्यावेळी त्याला आगामी सामन्यासाठी संघाच्या फलंदाजी क्रमात होणाऱ्या बदलांविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर तो म्हणाला की, “चांगला प्रश्न आहे. मला याची समिक्षा करण्यासाठी आणि रणनीती तयार करण्यासाठी इतर प्रशिक्षकांसोबत चर्चा करावी लागेल. फलंदाजी आमच्यासाठी चिंतेचा विषय आहे. विशेष म्हणजे चांगल्या खेळपट्टीवर देखील आम्ही चांगली फलंदाजी करत नाहीयत. संघात अनुभवी फलंदाज आहेत, जे परिस्थिती जाणतात आणि आधीपासून चांगले प्रदर्शन करत आले आहेत. आम्हाला यातून पुढे जावे लागेल आणि जर बदल करण्याची गरज पडली, तर आम्ही ते करू.”
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“आम्ही इथपर्यंत काही बदल करत आलो आहोत, पण जास्त नाही. आम्हाला फलंदाजीत सातत्य ठेवायचे होते. नक्कीच काही चिंतेच्या बाबी आहेत, कारण आम्ही अगोदर फलंदाजी करो किंवा लक्ष्याचा पाठलाग करो, आमच्या प्रदर्शनात सातत्य कमी पडत आहे.” असे तो पुढे बोलतना म्हणाला.
इशान किशन (Ishan Kishan) याने हंगामातील सुरुवातीच्या दोन सामन्यात अर्धशतकी खेळी केली होती, पण त्यानंतर त्याची बॅट शांत आहे. याविषयी बोलताना जयवर्धने म्हणाला की, “तो धावांसाठी झगडत आहे. आम्ही त्याला त्याचा नैसर्गिक खेळ खेळण्याचे स्वातंत्र्य दिले होते. मी आज (पराभवानंतर) अजून त्याच्याशी बोललो नाहीय, पण लवकरच त्याच्याशी चर्चा होईल.”
मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी पार पडलेल्या मेगा लिलावात ईशान किशनसाठी मोठी रक्कम खर्च केली होती, पण तो आता त्याचा साजेशे प्रदर्शन करताना दिसत नाहीय. त्याला संघात पुन्हा सहभागी करण्यासाठी मुंबई फ्रँचायझीने १५.२५ कोटी रुपये खर्च केले होते. पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की, तो प्लेइंग इलेव्हनमधून देखील बाहेर फेकला जाऊ शकतो.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
सीएसकेचा परदेशी शिलेदार चढला बोहल्यावर, प्रेयसीशी बांधली लग्नगाठ; PHOTO व्हायरल
बुलेटच्या वेगाने आला चेंडू, तरीही १५ यार्डच्या आत रोहितचा खतरनाक कॅच; पाहून फलंदाजही अचंबित
क्रिकेटर नसता, तर कोण झाला असता जोस बटलर? आर अश्विनला दिले ‘हे’ उत्तर