कोलकाता क्रिकेट क्लबचे प्रशिक्षक प्रितम चौधरी यांनी अनेक खेळाडूंना मोठ्या स्वप्नांसह मैदानात येताना पाहिले आहे. परंतु शाहबाज अहमद येईपर्यंत त्यांना असा खेळाडू दिसला नव्हता, ज्याच्या क्रिकेट किटमध्ये इंजीनिअरिंगची पुस्तके असतील. चौधरीसाठी ही नवीन गोष्ट आहे. शाहबाज आधी बंगाल संघासाठी रणजी ट्रॉफी खेळला आणि नंतर त्याला आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून संधी मिळाली. त्याने कोलकाता आणि राजस्थानविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शनही केले.
मंगळवारी (४ एप्रिल) राजस्थान रॉयल्स आणि बेंगलोरचा आमना- सामना झाला. या सामन्यात शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) आरसीबीसाठी २६ चेंडूत ४५ धावा करून बाद झाला आणि संघाच्या विजयात त्याचे योगदान महत्वाचे राहिले. आरसीबीने या सामन्यात ४ विकेट्सने विजय मिळवला. सामना संपल्यानंतर शाहबाजने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला की, “होय हा माझा तिसरा हंगाम आहे आणि या पातळीवर खेळताना खूप काळ झाला आहे. आता चांगले प्रदर्शन करण्याची वेळ आली आहे.”
शाहबाजच्या क्रिकेटचा प्रवास कोलकाता क्लब क्रिकेटमधून सुरू झाला. तो तपन मेमोरियल क्रिकेट क्लबशी जोडला गेला होता, ज्याला एक मोठा क्लब मानले जात नाही. प्रशिक्षक प्रितम चौधरी (Pritam Chaudhari) यांनी शाहबाजसोबतच्या स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणाले मोहन बगान, ईस्ट बंगाल किंवा कालीघाटच्या तुलनेत आमचा क्लब छोटा आहे. आम्ही त्यांच्याप्रमाणे मोठा खर्च करू शकत नाही. आम्ही नेहमी आमच्या वरिष्ठ खेळाडूंना बाहेरच्या मुलांवर नजर ठेवायला सांगतो, जे संधीच्या शोधात असतील.
असाच आमचा एक क्रिकेटपटू प्रमोद चंदीला (हरियाणा संघाचा खेळाडू) शाहबाजला याठिकाणी घेऊन आला, जो तेव्हा इंजीनिअरिंगचा विद्यार्थी होता. मला वाटले जेव्हा त्याचे सेमिस्टर असतील, तेव्हा तो काही सामने सोडेल. पण असे झाले नाही. आताही जेव्हा कधी शाहबाज शहरात असतो, प्रशिक्षकांच्याच घरी धांबतो. याविषयी बोलताना चौथरी म्हणाले की, माझी दोन मुले आहेत आणि शाहबाज माझा तिसरा मुलगा आहे. तो माझ्या कुटुंबाचा एक महत्वाचा भाग आहे. प्रोफेशनल क्रिकेटपटू बनल्यापासून त्याला क्वचितच घरी येणे शक्य होते.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगालचे प्रतिनिधित्व करताना शाहबाज एका फिरकी गोलंदाजीची भूमिका पार पाडत होता. मात्र, आरसीबीने त्याला मध्यमक्रमात फलंदाजीची संधी दिली. आरसीबीने हंगामात आतापर्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. संघाने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात दिनेश कार्तिकनेही शानदार खेळी केली आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा –