जगभरात पुन्हा एकदा कोविड-१९ (Covid-19) महामारीने डोके वर काढले आहे. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाची रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. क्रिकेट क्षेत्रातही याचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. याच पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय, BCCI) आयपीएल २०२२ (IPL 2022) च्या आयोजनासंदर्भात प्लॅन बी (Plan B) वर विचार करत आहे. या प्लॅन बीसंदर्भात मोठी माहिती पुढे आली आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आयपीएल २०२२ चे सर्व सामने महाराष्ट्र राज्यात (IPL 2022 In Maharashtra) आयोजित करण्याच्या विचारात आहे.
टाइम्स ऑफ इंडियामधील वृत्तानुसार, बीसीसीआय आगामी हंगामातील सर्व सामने महाराष्ट्रातील मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) शहरात आयोजित करू इच्छित आहे. मुंबईमध्ये ३ ठिकाणी, वानखेडे स्टेडियम, ब्रेब्रॉन स्टेडियम आणि नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये हे सामने घेण्याची त्यांची तयारी सुरू आहे.
व्हिडिओ पाहा-
बीसीसीआयच्या एका विश्वसनीय सूत्राने टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले आहे की, ५ जानेवारी रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ऍपेक्स काउंसिलच्या बैठकीत बीसीसीआयचे अंतरिम सीईओ हेमांत अमीन यांनी यासंबंधात मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विजय पाटील यांच्याशी चर्चा केली होती. यानंतर अमीन आणि पाटील यांनी मिळून एनसीपी सुप्रीमो यांच्या निवासस्थानी नेते शरद पवार यांची मुलाखत घेतली होती. यावर पवारांनी बीसीसीआयच्या प्रस्तावाला हिरवा झेंडा दाखवला आहे.
यानंतर या आठवड्यात किंवा येत्या १० दिवसांमध्ये बीसीसीआय आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अधिकारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य प्रमुख आणि इतर संबंधित आवश्यक परवानगींसाठी सचिन देबाशीष चक्रवर्ती यांना भेटणार आहेत, असेही ते म्हणाले.
याबरोबरच कोविड-१९ दरम्यान आयपीएलचे सामने खेळवले जाणार असल्याने संपूर्ण हंगामादरम्यान भरपूर दक्षता घेतली जाईल. कडक जैव सुरक्षित वातावरण, प्रेक्षकांची अनुपस्थिती आणि खेळाडू व सामना अधिकाऱ्यांचे वारंवार परिक्षण केले जाईल, असेही ते अधिकारी म्हणाले.
हेही वाचा- ‘किवी कर्णधारा’चा बांगलादेशविरुद्ध द्विशतकी धमाका, तब्बल २५२ धावा कुटत नावे केले मोठमोठे विक्रम
सहसा आयपीएलचे सामने फ्रँचायझींच्या घरच्या मैदानावर आणि इतर काही मैदानांवर खेळवले जातात. परंतु भारतातील कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता बीसीसीआय मुंबई आणि पुणे अशा केवळ २ च ठिकाणी हे सामने खेळवू इच्छित आहे. जेनेकरून खेळाडूंना जास्त प्रवास करावा लागणार नाही आणि यामुळे कोरोनाचा धोकाही थोड्याफार प्रमाणात कमी होईल. परंतु जर महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयच्या या प्रस्तावाला नकार दिला, तर आयपीएलचे सामने युएईमध्ये खेळवण्याच्या पर्यायावर काम केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
विराटच्या पुनरागमनामुळे कोणाला बाकावर बसवणार? अंतिम कसोटीसाठी अशी असेल ‘भारताची प्लेइंग इलेव्हन’
रॉस टेलरने ‘निरोप सामन्या’ला बनवले अविस्मरणीय, मैदानात पाऊल ठेवताच केली दिग्गजाची बरोबरी
हेही पाहा-