रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेच्या पहिल्या हंगामापासून ते 16व्या हंगामापर्यंत ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न हे स्वप्नच राहिले आहे. रविवारी (दि. 21 मे) आयपीएल 2023 स्पर्धेच्या अखेरच्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स संघाकडून 6 विकेट्सने पराभूत होताच आरसीबी संघ प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला. या पराभवानंतर विराट कोहली याचे आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न पुन्हा तुटले. अशात इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याने विराट कोहलीला सल्ला दिला आहे. पीटरसनने हा सल्ला ट्वीट करत दिला आहे, अशात नेटकरीही त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघ आतापर्यंत एकदाही ट्रॉफी जिंकू शकला नाहीये. यावर्षी चाहत्यांना आशा होती की, आरसीबी संघ आपला अखेरचा साखळी सामना जिंकून प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल. मात्र, त्यांच्या आशांवर पुन्हा एकदा पाणी फेरले गेले. अशात विराट कोहली (Virat Kohli) खूपच दुखी आहे, ज्याच्या अथक प्रयत्नांनंतरही संघाला अपेक्षित निकाल मिळाला नाही.
केविन पीटरसनचे ट्वीट
अशातच केविन पीटरसन (Kevin Pietersen) याचे ट्वीट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. पीटरसनने विराटला दुसऱ्या आयपीएल संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला आहे. त्याने या ट्वीटमार्फत विराटला दिल्ली कॅपिटल्स संघात सामील होण्यास म्हटले आहे. पीटरसनने ट्वीट करत लिहिले की, “आता वेळ आली आहे की, विराटने आरसीबीला सोडून कॅपिटल्स संघात गेले पाहिजे.”
Time for VIRAT to make the move to the capital city…! #IPL
— Kevin Pietersen🦏 (@KP24) May 22, 2023
पीटरसनच्या या ट्वीटवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी असे म्हटले आहे की, “विराट कोहली त्याच्या संघासाठी खूपच प्रामाणिक आहे आणि असे वाटत नाही की, तो फक्त ट्रॉफीसाठी आरसीबी सोडेल.” तसेच, एका युजरने लिहिले की, “जर विराटला दुसऱ्या संघात जायचेच असेल, तर त्याने चेन्नई सुपर किंग्स संघात गेले पाहिजे. धोनीनंतर विराटने संघाची धुरा सांभाळली पाहिजे.”
विराट 2008पासून आरसीबीसोबत
खरं तर, विराट कोहली 2008मध्ये आरसीबी संघाशी जोडला गेला होता. 2013मध्ये विराटने आरसीबीच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली होती. मागील वर्षी त्याने कर्णधारपद सोडले होते आणि त्याच्या जागी फाफ डू प्लेसिस कर्णधार बनला होता. मात्र, आजही चाहते आरसीबी संघाला विराटच्या नावाशीच जोडतात. (ipl 2023 former cricketer kevin pietersen suggested virat kohli leave rcb join delhi capitals)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस
संपलाय रे तो! IPL 2023 दिनेश कार्तिकचा शेवटचा हंगाम? खराब सिझनविषयी आली मोठी प्रतिक्रिया